Sustainable Agriculture Model : उत्पन्न अन् सुपीकतेत शाश्वततेसाठी दिवेकरांचा प्रयत्न

बदलते हवामान, बाजारपेठेचा अभ्यास यासोबतच दूरदृष्टीने मातीच्या सुपीकतेवर भर देणारे त्यांचे मॉडेल परिसरातील अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणा देत आहे.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Sustainable Agriculture Model पुणे जिल्ह्यातील वरंवड (ता. दौंड) येथील रमेश काशिराम दिवेकर यांच्याकडे वडिलोपार्जित २६ एकर शेती (Agriculture) आहे. त्यांची गोपीनाथ आणि अमोल अशी दोन्ही मुले उच्चशिक्षित असून, शेतीमध्ये कार्यरत आहेत.

गेल्या सात वर्षापासून हे बंधू एकमेकाच्या साथीने आपली शेती शाश्वत (Sustainable Agriculture) करण्यासाठी प्रयोग आणि प्रयत्न करत आहेत.

पिकांची निवड करताना बाजारपेठेच्या अभ्यासाबरोबरच जमिनीची सुपीकता ()Soil Fertility) महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आर्थिक नफा तोट्याचे सूत्र बघतानाच दीर्घकालीन शाश्वतता अधिक महत्त्वाची मानतात.

नोकरीऐवजी दिले शेतीला प्राधान्य

गोपीनाथ दिवेकर हे एम.एस्सी. (ॲग्री) केल्यानंतर नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्यरत होते. पॅकेजही उत्तम असले तरी त्यांचा ओढा शेतीकडेच अधिक होता. आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या शेतीलाच का नसावा, या विचाराने त्यांनी नोकरी सोडली.

बंधू अमोल हेही बी. कॉम झालेले आहे. एकजुटीने काम केल्यास केवळ शेतीतूनही संपूर्ण कुटुंबाची प्रगती साधता येते, हेच या उच्चशिक्षित नवीन पिढीने सर्वांना दाखवून दिले आहे.

Agriculture
Soil Science : मृदा विज्ञानासमोरील वाढती आव्हाने

एकपीक पद्धतीकडून बहूपीक पद्धतीकडे वाटचाल

पूर्वी त्यांच्याकडे फक्त ऊस हेच पीक घेतले जाई. मात्र, त्यामुळे ढासळत चाललेला मातीचा पोत, दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई, अतिरिक्त ऊस क्षेत्रामुळे कारखान्याकडून वेळेवर तोडणी न होणे अशा अनेक कारणामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. त्यातच उत्पादन खर्चात वाढ होत होती.

मग गोपीनाथ व अमोल यांनी पीक पद्धतीत आमूलाग्र बदल केले. कांदा, झेंडू, टोमॅटो, वेलवर्गीय पीक यासारख्या हंगामी पिकांसोबतच डाळिंब, पेरू अशा फळपिकाचा अंतर्भाव केला.

केवळ एकाच पिकावर अवंलबून राहण्यापेक्षा अनेक पिकांमध्ये जोखीम विभागली जात आहे. शाश्वत उत्पन्नासाठी मिश्र शेती तंत्रज्ञानाचा अवलंब केला.

बदलते हवामान आणि बाजारातील दराचे चढ उतार यांचा अभ्यास करत प्रयोगातून आपली शेती शाश्वत करण्याचा प्रयत्न केला. त्यातून एक प्रारूप तयार केले आहे.

Agriculture
Soil Test : मातीचा नमुना घेण्याची अचूक पद्धत

डाळिंब आणि पेरू ह्या पिकामध्ये पहिल्या दोन वर्षात आंतरपिकांचे केलेले प्रयोग ः

डाळिंब + बीट (तुषार सिंचन), डाळिंब + कांदा किंवा कांदा रोपवाटिका, डाळिंब + टोमॅटो, डाळिंब + झेंडू इ.

पेरू + कांदा, पेरू + टोमॅटो, पेरू + झेंडू,

ऊस + कांदा, ऊस + बीट

टोमॅटो + कारले

भोपळा + काकडी

लागवडीची पद्धत

एकदा गादीवाफे व्यवस्थित तयार करून घेतले की त्यावर सलग चार ते पाच टोमॅटो रोपे लावली जातात. या रोपांच्या लागवडीनंतर २५ दिवसांनी कारल्याचे दोन बी समोरासमोर लावले जातात.

त्यातून टोमॅटोला उत्पादनखर्चाच्या तुलनेत दर मिळाले नाहीत, तरी कारल्याच्या उत्पादनाचा चांगला हातभार लागतो. कोणत्याही एकाच पिकाच्या लागवडीतून होणारा तोटा मर्यादित राखता येत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

पाण्याचा योग्य वापर

गेल्या काही वर्षापासून या भागात सिंचनासाठी पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीत क्षाराचे प्रमाण वाढत आहे. ही समस्या आपल्याकडे उद्भवू नये, यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.

पिकांमध्ये सूक्ष्म वातावरण वाढीसाठी अनुकूल करण्यासाठी एकाच पिकांमध्ये ठिबक आणि तुषार पद्धतीचाही अवलंब ते करतात. त्यामुळे खर्चात वीस हजार रुपये इतकी थोडी वाढ झाली असली तरी उत्पादन, दर्जा वाढतो.

विहिरीच्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण अधिक असून, त्यासाठी इलेक्ट्रो मॅग्नेटिक वॉटर कंडिशनरही वापरत आहेत. त्यासाठी ४५ हजार रु. खर्च आला.

Agriculture
Agriculture Graduate : कृषी पदवीधर माजी विद्यार्थी ५३ वर्षानंतर आले एकत्र

सुपीकतेसाठी प्रयत्न

रासायनिक खताचा अगदी गरजेपुरता वापर हे त्यांचे सूत्र आहे. त्यासाठी एकरी १५ रुपयापर्यंत खर्च येतो. यामध्ये रासायनिक आणि विद्राव्य खते यांचा समावेश आहे. त्यामुळे खतांवरील खर्चात पीकनिहाय ५ ते २५ हजारपर्यंत इतकी बचत साधते.

त्यांच्या मते रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा सामू अत्यंत वेगाने वाढत असून, जमीन चुनखडीयुक्त किंवा चोपण बनत चालली आहे.

यावर उपाय म्हणून शेतीमध्ये कंपोस्ट व सेंद्रिय खतांचे प्रमाण वाढवले आहे. स्वतःचे शेणखत नाही. त्यामुळे एकरी चार ते पाच ट्रॉली इतके कंपोस्टखत विकत घेतो. त्यामुळे खर्चात एकर २० हजार रुपये वाढ झाली तरी सेंद्रिय कर्ब वाढण्यासोबतच मातीचा सामूही नियंत्रित राहण्यास मदत होते.

पाळी घालणे, खोल नांगरट करणे, रोटर मारणे या नियमित मशागतीसोबतच वर्षातून एकदा सबसॉयलरचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीतून पाणी व क्षारांचा निचरा चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. अतिक्षारामुळे जमिनी नापिक होण्यापासून बचाव होतो.

पिकाच्या संरक्षणासाठी केवळ फवारण्यावर अवलंबून राहण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे सापळे वापरले जातात. उदा. अत्याधुनिक सोलर ट्रॅप, फळमाशीसाठी रक्षक सापळे, रसशोषक किडीसाठी चिकट सापळे, नागअळी नियंत्रणासाठी वॉटर ट्रॅप, डेल्टा ट्रॅप याचा एकात्मिक पद्धतीने वापर केला जातो.

पिकाच्या भोवती चारही बाजूने मक्याची दाट लागवड केली जाते. यामुळे रसशोषक किडींना अटकाव होते. तसेच यावर मित्रकिटकांची वाढ होऊन ते पिकांच्या आतील किडींचा फडशा पाडतात. अशा विविध उपायांमुळे फवारण्यावरील खर्चात मोठी बचत होते.

शेतीमालाची विक्री

शेतीमाल बाजारात नेण्यासाठी स्वतःची गाडी आहे. त्याद्वारे पुणे, मुंबई व दौंड बाजारामध्ये माल नेला जातो. बाजारात पाठविण्यापूर्वी प्रत्येक कॅरेटचे वजन करूनच गाडीमध्ये भरले जाते. त्यामुळे वजनामध्ये मारले जाण्याचा धोका कमी होते.

आरोग्य व शिक्षणाची तजवीज

घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी आरोग्य विमा उतरवला आहे. याशिवाय शेतात काम करणाऱ्या वाटेकरी किंवा अर्धेलीदाराच्या कुटुंबाचाही आरोग्य विमा उतरला आहे. त्यासाठी त्यांना इतका वार्षिक एक लाख १० हजार रुपयांचा हप्ता (प्रिमियम) भरावा लागतो.

दोघा भावांची मिळून चार मुले आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी सव्वा लाख रु. इतकी तरतूद केली जाते.

- गोपीनाथ दिवेकर, ७६६६१३९७९६, ९९२२४७९००६

दिवेकर यांचे एकूण क्षेत्र ः २६ एकर

पीकनिहाय क्षेत्र ः ऊस - सात एकर, टोमॅटो - दोन एकर, काकडी - दोन एकर (हंगामात), कांदा - दहा एकर (रब्बी हंगामात), झेंडू - चार एकर.

डाळिंब - दोन एकर (६३० इतकी झाडे), पेरू - दोन एकर (७५० इतकी झाडे)

पीक निहाय ताळेबंद

पीक एकूण क्षेत्र उत्पादन खर्च (एकरी) उत्पादन (क्विंटल किंवा टन प्रति एकर) मिळालेला सरासरी दर (रुपये प्रति क्विंटल) एकूण उत्पन्न (रुपये प्रति एकर) वैशिष्ट्य

टोमॅटो २ ते ५ एकर १.३० ते १.५० लाख रु. ६० टन (खरीप), ७० टन (रब्बी), ४० टन (उन्हाळी) १० हजार हंगामनिहाय २ ते ५ लाख गुणवत्तापूर्ण माल

कांदा ५ एकर ७० -८० हजार १५-२० टन १४०० २.१५ हजार एकसारखी साईज, चमक असलेला कांदा, डबल पत्ती,

काकडी २ एकर ४५ हजार २५ -३० टन ८०० २ ते २.४० हजार एक सारखी साईज असलेला

झेंडू चार एकर ८० हजार ७- १० टन १७०० १. ७० हजार आकर्षक, मोठ्या आकाराच्या झेंडूचे उत्पादन

डाळिंब दोन एकर ५० हजार अद्याप उत्पादन सुरू नाही -- --

पेरू दोन एकर ५० हजार अद्याप उत्पादन सुरू नाही --

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com