Agriculture Graduate
Agriculture GraduateAgrowon

Agriculture Graduate : कृषी पदवीधर माजी विद्यार्थी ५३ वर्षानंतर आले एकत्र

गेल्या ५३ वर्षानंतर महाराष्ट्रातील सर्व भागातून माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनात सहभागी झाले होते.
Published on

पुणे : पुणे कृषी महाविद्यालयातून १९७० साली पदवीधर झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन महाविद्यालयातील उद्यानविद्या विभागाच्या चिमा सभागृहात रविवारी (ता. १२) उत्साहात पार पडले. गेल्या ५३ वर्षानंतर महाराष्ट्रातील सर्व भागातून माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनात सहभागी झाले होते.

माजी विद्यार्थी संमेलनाचे उद्‌घाटन व स्मरणिकेचे प्रकाशन उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. सुभाष भालेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. रामचंद्र साबळे, चंद्रकांत गायकवाड हे उपस्थित होते.

या प्रसंगी प्रकाशन झालेल्या स्मराणिकेत कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर यांनी स्नेहसंमेलनास शुभेच्छा देताना या बॅचच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला आहे. स्मरणिकेत प्रत्येकाची माहिती असल्याने ती संग्राह्य झाली आहे.

Agriculture Graduate
Agri Student Protest : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांचा ठिय्या दहाव्या दिवशीही सुरूच

या वेळी महाविद्यालयात चार वर्षे शिक्षण घेतले होते, आयुष्यभर उपयोगी पडणारी ज्ञानरूपी शिदोरी मिळाली त्या मायेच्या प्रांगणात एकत्र येण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर शिक्षण, संशोधन, क्रीडा, प्रशासन, वित्त, शेती, नर्सरी, पर्यटन अशा विविध क्षेत्रात उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली आहे. विशेषतः बॅंकाच्या राष्ट्रीय करणानंतर कृषी पतपुरवठा क्षेत्रात या बॅचचे महत्त्वाचे योगदान आहे. या वेळी संपत शेळके, आर. वाय. जाधव, शिवाजी मोहिते, सुभाष पाटणे, शंकर दांगट, शिवाजी घोरपडे, आर. के. वहाडणे, भालचंद्र कुलकर्णी, गुलाब गोरडे, दशरथ शेवाळे, विष्णू हिंगणे, अरुण भोसले, वाय. डी. पाटील, पी. आर. पोखरकर, दशरथ थोरवे, बी. बी. यादव, श्रीराम शास्त्री, उत्तम मोरे अशा विविध पदवीधरांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील स्मृतींना उजाळा दिला.

Agriculture Graduate
Agri Student Protest : महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा ‘कॅण्डल मार्च’

स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी शिवाजीराव भोईटे, मेघश्याम घोलप, अमृत साळुंखे, चंद्रकांत गायकवाड, अनंत डुंबरे, ज्ञानदेव सरोदे आदींनी विशेष प्रयत्न केले. संमेलनात सुरेश डेरे यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

कृषी महाविद्यालयात नव्याने सुरू असलेल्या देशी गाई संशोधन प्रकल्प, बेकरी उद्योग, जिवाणू खते, उच्च तंत्रज्ञान व भाजीपाला प्रकल्प, उद्यानविद्या विभागातील रोपवाटिका व भाजीपाला उत्पादन प्रकल्प, अळिंबी मशरूम असे विविध प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पाची उपस्थितांना माहिती दिली. सर्व उपस्थित निवृत्त कर्मचारी बॅचला विद्यापीठाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

- प्रा. डॉ. सुभाष भालेकर, उद्यानविद्या विभाग, पुणे कृषी महाविद्यालय, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com