Flower Farming : फुलशेतीतून मिळाला शाश्वत उत्पन्नाचा मार्ग

Farmer Group Farming : रिसोड तालुक्यातील पळसखेड येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत गटशेतीची वाट धरली.
Flower Farming
Flower FarmingAgrowon
Published on
Updated on

Washim News : रिसोड तालुक्यातील पळसखेड येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत गटशेतीची वाट धरली. २० शेतकऱ्यांचा समूह गट तयार करून झेंडूची शेती सुरू केली आहे. दररोज २५ रुपये प्रतिकिलो दराने फुलांची शेतातूनच विक्री केली जात आहे.

या वर्षात शेतकऱ्यांना खरिपापाठोपाठ रब्बी हंगामातही अनेक संकटांचा सामना करावा लागला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे अर्ध्यापेक्षा जास्त रब्बी पिकांची नासाडी झाली. हरभरा जळून गेल्यानंतर शेतात दुबार पेरणी न करता या शेतकऱ्यांनी झेंडू फुलांची लागवड केली.

Flower Farming
Flower Farming : शेतकरी नियोजन ः फुलशेती

तेजराव आत्माराम खरात, स्वप्नील दगडू खरात, तानाजी धनाजी कराड, गजानन गणपत कराड, महादेव रामेश्वर घुगे, निखिलेश माणिक खरात, नंदकिशोर डिगांबर खरात, यांच्यासह २० शेतकऱ्यांनी एकत्र येत समूह गट तयार केला. झेंडूची लागवड करण्यापूर्वी विक्री व्यवस्थापन व बाजारपेठेची संपूर्ण माहिती घेतली.

फुलांचे व्यापारी व दलालांशी संपर्क करून फुले विक्रीचे सर्व नियोजन केले. २० शेतकऱ्यांनी समूह गट तयार करून प्रत्येक शेतकऱ्याने एकर ते दोन एकर झेंडू फुलाची लागवड केली. लागवड केल्यानंतर जवळपास दीड ते दोन महिन्यांत झेंडूची फुले विक्रीला आली आहेत.

Flower Farming
Flower Farming : शेवंती फुलशेतीत यवतने मिळवली ओळख

पुणे, मुंबई, हैदराबाद व भोपाळ या ठिकाणी दलालांमार्फत शेतातूनच प्रति किलो २५ रुपये दराने फुलांची विक्री केली जात आहे. आठवड्यातून एक दिवस गावातच व्यापाऱ्याची गाडी येत असल्यामुळे या शेतकऱ्यांना सोयीचे झाले. आठवड्यातून एक दिवस परिपक्व झालेल्या फुलांची तोडणी करून विक्री केली जात आहे.

फुलांना बाजारात भावही चांगला मिळत असल्यामुळे व विक्रीसाठी भेटण्याची गरज नसल्यामुळे शेतकऱ्यांना झेंडूची शेती फायदेशीर ठरते आहे. या शेतकऱ्यांना खर्चवजा जाता एकरी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

मी दीड एकरात झेंडू फुलाची लागवड केली आहे. डिसेंबर तसेच या महिन्यात वातावरण चांगले असल्यामुळे गेंद चांगला तयार झाला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून फुलांची मागणी वाढली आहे. ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत गावातच फुलांची विक्री झाली आहे.
तेजराव आत्माराम खरात, शेतकरी, पळसखेडा, ता. रिसोड, जि. वाशीम
मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर झेंडूच्या फुलाची लागवड केली होती. मोठ्या शहरांमध्ये वर्षभर फुलांची मागणी असते. त्याबद्दल व्यापाऱ्यांशी संपर्क करून व गावातील २० शेतकरी एकत्र येऊन झेंडूची लागवड केली आहे. यावर्षी भावही चांगला मिळत असल्यामुळे बऱ्यापैकी नफा मिळणार आहे.
स्वप्नील दगडू खरात, शेतकरी, पळसखेडा, ता. रिसोड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com