Crab Farming : खेकडापालन, पदार्थ अन् तेलनिर्मितीही...

Food and Oil Production : पुणे जिल्ह्यातील ओतूर- मेंगाळवाडी येथील शांताराम वारे यांनी सहा वर्षांपूर्वी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन खेकडापालन या पूरक व्यवसायास सुरुवात केली. अभ्यास, कष्ट, अनुभव व ग्राहक जोडण्याचे कौशल्य आदींची जोड देत त्यात जम बसवला.
Food and Oil Production
Food and Oil ProductionAgrowon
Published on
Updated on

Success Story : हवामान बदलाच्या अलीकडील बेभरवशाच्या काळात केवळ पिकांवर अवलंबून राहणे शक्य राहिलेले नाही. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायांचा आधार शेतकऱ्यांनी दिला आहे. पुणे जिल्ह्यातील ओतूर जवळील मेंगाळवाडी येथील शांताराम वारे यांची ९४ गुंठे शेती आहे. त्यात ते कांदा, सोयाबीन आदी पिके घेतात. सुमारे सहा वर्षांपूर्वी त्यांनी पूरक व्यवसायाची चाचपणी सुरू केली.

आपल्या परिसरातील भौगोलिकता, पाण्याचे स्रोत व ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन खेकडापालन हा व्यवसाय आपल्यासाठी किफायतशीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्थानिक नागरिक, खवय्ये, रुग्णांकडून खेकड्याला पसंती देण्यात येते. मात्र गोड्या पाण्यातील काळ्या पाठीचा खेकडा बाजारात फारसा उपलब्ध होत नाही. काही वेळा ग्राहकांना सर्वत्र फिरूनही हे खेकडे वेळेवर मिळत नाहीत. हीच आपल्यासाठी मोठी संधी असल्याचे वारे यांनी जाणले.

कष्ट व विविध प्रयोग

कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन नसल्याने वारे यांनी स्वानुभव, कष्टांची जोड देत चाकोरीबाहेर जाऊन खेकडापालनातील प्रयोग सुरू केले. खेकड्याचा अधिवास, तळे, खाद्य, एकूणच व्यवस्थापनाचा अभ्यास, विक्री असा सगळा अनुभव घेत सहा वर्षांत ते खेकडापालन व्यवसायात तरबेज झाले देखील. वीस बाय १५ फूट लांबी-रुंदी व चार फूट खोलीची मुख्य टाकी आहे. बाजूला असलेल्या १५ बाय सहा फूट आकाराच्या छोट्या टाकीत पाणी भरून ठेवण्यात येते.

त्यातून मुख्य टाकीत पाणी सोडून खेकडापालन केले जाते. मुख्य टाकीत तळाला माती आहे. खेकड्यांना आसऱ्याची जागा म्हणून मातीच्या कुंड्या आणि पाण्यात वाढणाऱ्या गवत आहे. काहीवेळा खेकड्याची वाढ न होणे, जास्त प्रमाणात मरतुक होणे असेही अनुभव आल्याने नैसर्गिक वातावरणात उत्पादन घेण्यासाठी घराजवळ एक एक गुंठा क्षेत्रावर तीन तळी घेत त्यात संगोपन सुरू केले आहे.

Food and Oil Production
Success Story : डोंगरमाळ, खाचखळग्यातून धावतोय शेतकरीपुत्र देव

बीज व पैदास

गावापासून जवळ पिंपळगाव जोगा हे धरण आहे. तेथून पिंजऱ्यात खेकडे पकडणाऱ्या व्यक्तींकडून छोटे खेकडे व पिले विकत घेण्यात येतात. प्रति मादी सुमारे पाचशे ते एक हजारांपर्यंत पिले देते.

त्यामुळे पैदास मोठ्या प्रमाणावर होते. सर्वसाधारण वर्षभरानंतर खेकडा विक्रीयोग्य होतो. प्रति खेकड्याचे वजन ५०० ग्रॅमपर्यंत असते. साधारणपणे चार ते पाच खेकड्यांचे वजन एक किलोच्या आसपास भरते. खाद्य म्हणून आठवड्यातून एकदा छोटे मासे देण्यात येतात.

विक्रीची शोधली संधी

फेसबुक, यू-ट्यूब आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायाचे प्रमोशन केले आहे. जुन्नर- ओतूर भाग व तेथील अनेक ठिकाणी पर्यटनासाठी अनुकूल असल्याने पर्यटकांची या भागात कायम रेलचेल असते. वारे यांच्या शेतापासून मुंजोबा डोंगर, धबधबा असे पॉइंट असल्याने त्याचा व्यवसायासाठी चांगला फायदा त्यांनी करून घेतला आहे. रस्त्याच्या बाजूला घराजवळ छोटे हॉटेल सुरू केले आहे.

येथे खेकडा भाजी, खेकडा रस्सा, फ्राय, सूप असे विविध पदार्थ बनविले जातात. ग्राहकांना प्रति ताट २०० रुपये, तर अन्य पदार्थ ५० ते १५० रुपये दर अशी पदार्थांची सेवा दिली जाते. पावसाळ्यात ग्राहकांची संख्या तुलनेने अधिक असते. आतापर्यंत शेकडो ग्राहक जोडले आहेत. या ठिकाणी खेकडा तेलही उपलब्ध केले जाते. गोड्या पाण्यात आढळणारा काळ्या पाठीचा खेकडा खाण्यासाठी अधिक चवदार असतो व त्यापासून तेलही चांगले मिळते असे वारे यांनी सांगितले.

Food and Oil Production
Crab Farming : पाच गुंठे क्षेत्रावर खेकडापालनाचा प्रयोग

तेलनिर्मितीतून विस्तार

वारे यांनी व्यवसायातून वर्षभर उत्पन्न सुरू राहील असे नियोजन केले आहे. तेलनिर्मिती त्याचाच भागआहे. खेकड्याच्या आतील मधला भाग पिवळा असतो. घरगुती स्वरूपात मंद आचेवर उष्णता देऊन उकळून त्यापासून तेल बनले जाते. प्रति एक किलो खेकड्यांपासून १०० मिलि, तर दर महिन्याला ५०० मिलि ते एक किलोपर्यंत तेल मिळते.

प्लॅस्टिक बॉटलमध्ये पॅकिंग करून त्याची १०० मिलिसाठी ५०० रुपये दराने विक्री केली जाते. विक्री भाजलेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी तसेच मसाज, त्वचा विकार, संधिवात, स्नायुदुखी, अर्धांगवायू आदी विविध आजारांमध्ये त्याचा उपयोग असल्याचे सांगण्यात येते. अर्थात, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच त्याचा वापर करणे गरजेचे असल्याचे वारे सांगतात.

अर्थकारण उंचावले

या व्यवसायात कोणत्याही मजुराची मदत न घेता संपूर्ण वारे कुटुंब राबते. त्यामुळेचअर्थकारण किफायतशीर करण्यात यश आले आहे. शांताराम यांना बहीण कालिंदा पारधी, भाऊ सतीश, मुलगी चंदना, स्वाती वारे यांची मोठी साथ मिळते. दररोज सरासरी ४ ते ५ किलो, तर महिन्याला सुमारे १५० किलोपर्यंत खेकड्यांची विक्री प्रति किलो ३५० रुपये दराने होते. दर महिन्याला एक किलोपर्यंत तेलाची विक्री होते.

हॉटेल व्यतिरिक्त प्रदर्शने, महोत्सवातून खेकड्यावर आधारित पदार्थांचा स्टॉलही वारे घेतात. खाद्य, मजुरी अशा विविध कारणांसाठी मुख्य खर्च होतो. महिन्याला ५० टक्क्यांपर्यंत नफा शिल्लक राहतो. आता शेतात सुमारे दोनशे मधपेट्याही ठेवल्या आहेत. त्यापासून मधसंकलनाचाही विचार आहे.

शांताराम वारे ९८९००७८९९३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com