Europe Agriculture : युरोपातील बदलती शेती अन्‌ उद्योग क्षेत्र

Norway Agriculture : युरोप खंडामध्ये ४४ देशांचा समावेश आहे. युरोप खंडातील प्रगत देशांमध्ये डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड, स्वीडन या स्कॅन्डिनेव्हियन देशांचा समावेश होतो. अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही स्कॅन्डिनेव्हियन देशांमधील शेती, समाजजीवन, बँकिंग, प्रक्रिया उद्योग, शेती उद्योग, संशोधन केंद्रांना भेटी दिल्या.
Europe Agriculture
Europe AgricultureAgrowon

Continent of Europe in Agriculture :

निसर्गसंपन्न नॉर्वे

नॉर्वेला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. या देशात काही ठिकाणी सूर्य फक्त ३० मिनिटांसाठीच मावळतो आणि पुन्हा उगवतो. निसर्गाची ही किमया या ठिकाणीच पाहायला मिळते. नॉर्वे हा निसर्गसंपन्न देश असून, या देशाने पर्यटनावर लक्ष केंद्रित केले आहे. नैसर्गिक साधनांचा कल्पकतेने वापर केला आहे. डेन्मार्कच्या तुलनेत नॉर्वेत जंगलांचे प्रमाण खूप जास्त आहे. जंगल व सागरी उत्पादनापासून या देशाला मोठे परकीय चलन मिळते.

या देशात ५ ते ७ टक्के लोक शेती करतात, त्यामुळे उत्पादनावर मर्यादा आहेत. त्यामुळे या ठिकाणी उपलब्ध शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त पीक उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ सहा महिनेच शेतीमध्ये पीक लागवड करता येते. काही लोक हिवाळ्यात पॉलिहाउसमध्ये भाजीपाला रोपांची लागवड करतात. या देशात संशोधन केंद्र आणि शेतकऱ्यांच्यामध्ये चांगला समन्वय पाहावयास मिळतो.

या देशातील नागरिक नियमांचे तंतोतंत पालन करतात. महिलांना सर्व ठिकाणी समान संधी दिली जाते. या ठिकाणी युरोपमधील महत्त्वाच्या बॅंकांची कार्यालये आहेत. बँका ग्राहकांना डिजिटल सेवा देतात. त्यामुळे ग्राहकसुद्धा बँकेत अभावानेच येतात. या देशांत रेस्टॉरंट, दुकाने, बँका वेळापत्रकाप्रमाणे काटेकोर काम करतात. शहरातील सर्व व्यवहार सकाळी १० वाजता सुरू होतात आणि सायंकाळी ५ वाजता बंद होतात.

खनिजांनी संपन्न फिनलॅंड

फिनलॅंड देशातील लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे आहे. सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा, इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर, प्रदूषण अत्यंत कमी, ७२ टक्के जंगलव्याप्त प्रदेश, १०० टक्के साक्षरता, बालमृत्यू दर नगण्य ही या देशाची वैशिष्ट्ये आहेत. नागरिकांना सन्मानाची वागणूक दिली जाते. या देशात जंगल व

समुद्रातून मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती प्राप्त होते. शासन सर्वांना शैक्षणिक व आरोग्यसुविधा पुरविते. मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या देशाचा भाग समुद्राने जास्त व्यापला असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला जातो. सर्व पिकांना ठिबक सिंचनाने पाणी दिले जाते. पाऊस हमखास पडत असतो, त्यामुळे पिकेही चांगली येतात.

Europe Agriculture
Vegetable Farming Business : होय! वर्षभर भाजीपाला पिकवतो...थेट विक्री साधतो

जगभरातील हुशार बेरोजगार युवक नोकरी व कामधंद्यासाठी या देशात येतात. भारतीय लोकांनासुद्धा या ठिकाणी नोकरीची संधी आहे. या देशातील नवीन पिढी तुलनेने थोडी आरामात जगत असल्यामुळे येथील सरकारला काळजी वाटते. त्यामुळे देशातील मुले अधिक सुशिक्षित आणि व्यावसायिक होण्याच्या दृष्टीने सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. नॉर्वेएवढी नैसर्गिक संपन्नता फिनलँडमध्ये नसली तरी इतर स्रोतांच्या माध्यमातून म्हणजे ७२ टक्के जंगलव्याप्त भागातून घरबांधणी किंवा कागदनिर्मितीसाठी लागणारे लाकूड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते.

या देशातील बँकिंग व्यवस्था अतिशय प्रगत आहे. डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा दिली जाते. ठेवी बँकांमध्ये ठेवल्यास व्याज दिले जात नाही. या ठिकाणी पैसे सुरक्षित राहण्यासाठी ग्राहक बँकांमध्ये ठेवी ठेवतात. त्यांना या मोबदल्यात बँकिंगच्या काही सेवा, सवलती दिल्या जातात. शेतकरी व व्यवसायिकांना पत पाहून ३.५० ते ४.५० टक्के व्याजदराने कर्जे उपलब्ध करून दिली जातात. थकबाकीचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. नैसर्गिक किंवा एखाद्या अन्य कारणाने व्यवसाय अडचणीत आल्यास शासन सर्व प्रकारची मदत करते.

Europe Agriculture
Agro Processing Industry : उसाच्या साखरेवर आधारित पर्यावरणपूर्वक डिटर्जंट पावडर

डेन्मार्कची डेअरी उद्योगात आघाडी

डेन्मार्कमध्ये सहा महिने पाऊस, सहा महिने हिवाळा आणि उन्हाळा असतो. या देशामध्ये आम्ही हायड्रोपोनिक (मातीविना शेती) उद्योगाला भेट दिली. या ठिकाणी विदेशी भाजीपाल्याची लागवड केली जाते. या देशात नैसर्गिक स्रोतांचा जास्तीत जास्त वापर केल्याचे आढळून आले. काही ठिकाणी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केले जाते. या पाण्यावर प्रक्रिया करून वापर केला जातो. अनेक ठिकाणी सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केला जात असल्याचे दिसून आले.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोकळ्या जागी तसेच घरांच्या गच्चीवर वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड येथील नागरिकांनी केलेली दिसली. या देशात लोकसंख्येची घनता खूपच कमी आहे. मनुष्यबळ कमी असल्याने यांत्रिक साधनांचा वापर अधिक केला जातो. या देशातील रस्ते अत्यंत स्वच्छ, रेखीव असून, लोक कचरापेटीतच कचरा टाकतात. रस्त्यावर थुंकण्यास मनाई आहे. लोकांनी स्वतःला तशी सवय लावून घेतली आहे.

डेअरी हा या देशाचा प्राथमिक उत्पन्नस्रोत आहे. या देशाने डेअरी उद्योगात मोठी क्रांती केली आहे. डेन्मार्कमधील गाय दिवसाला ४५ लिटर दूध देते. दुग्धोत्पादनवाढीस या देशाने चालना दिली आहे. दुधाचे दर ग्राहक आणि उत्पादकांना परवडतील असे आहेत. गाईसाठी अत्याधुनिक गोठे आहेत. काटेकोर व्यवस्थापनावर येथील पशुपालकांचा भर आहे. एखादी गाय आजारी पडल्यास त्वरित आजाराचे निराकरण केले जाते. आजारी गाईंना स्वतंत्र कक्षात ठेवले जाते.

औद्योगिक आघाडीवर स्वीडन

स्टॉकहोम ही स्वीडनची राजधानी आहे. या देशाने शेतीपेक्षा इतर उत्पादनांत क्रांती केली आहे. युरोपमध्ये सर्वांत प्रगत बँकिंग या देशामध्ये पाहावयास मिळते. रोबो बँकेची संकल्पना या देशात पाहायला मिळते. स्वीडनची लोकसंख्येची घनता जास्त आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या स्टॉकहोम शहरात लोकांचे वास्तव्य अधिक संख्येने आहे. फिनलँड किंवा नॉर्वेप्रमाणे येथे जंगलव्याप्त क्षेत्र जास्त आहे.

जंगलापासून खनिज संपत्ती मिळत असली तरी समुद्र आणि तलावातून मोठ्या प्रमाणावर मासेमारी, गाई-म्हशींचे पालन, शेळ्या-मेंढ्या, पोल्ट्री इत्यादी व्यवसायांना चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच परदेशी भाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड पाहायला मिळते. या ठिकाणी टोमॅटो, कॉर्न, लाल कोबी, रंगीत मिरची या भाज्यांची लागवड पाहायला मिळते. स्टॉकहोम शहर अत्यंत शिस्तबद्ध आराखडा असलेले असून, रस्ते इतर देशांच्या तुलनेत अत्यंत रुंद आणि स्वच्छ आहेत.

रहदारीच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाते. पोलिस व अग्निशमन यंत्रणा अत्यंत जागृत असतात. या सर्व देशांमध्ये आपल्या तुलनेत महागाई खूपच जास्त आहे. आपल्या देशापेक्षा या ठिकाणी महागाई या ठिकाणी १० ते १२ पट जास्त आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक केला जातो. सायकल व पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक आहेत. त्यामुळे रस्त्यांवर गर्दी दिसत नाही. आपले काम व आपले उद्दिष्ट हेच तेथील लोकांचे ध्येय असते. या देशामध्ये आठवड्याला कर्मचारी ३७ तास काम करतात. या देशातील नागरिक वर्षातून एकदा म्हणजे उन्हाळ्यात एप्रिल ते जून या कालावधीत कुटुंबातील सर्व लोकांसह १५ दिवस ते एक महिना इतर देशांत पर्यटनासाठी जातात.

डॉ. राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२०

(लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com