Food Processing : विद्यार्थी गिरवताहेत अन्नप्रक्रिया उद्योगाचे धडे

Food Technology : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘कार्यानुभवातून शिक्षण’ हा उपक्रम राबविला जातो. त्याअंतर्गत फळे- भाजीपाला व बेकरी- कन्फेक्शनरी विषयातील प्रक्रिया पदर्थनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते.
Student Entrepreneurship
Student Entrepreneurship Agrowon
Published on
Updated on

VNMKV Parbhani Student Entrepreneurship : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत परभणी येथे १९७६ मध्ये अन्नतंत्र महाविद्यालय सुरू झाले. मराठवाड्यातील हे या प्रकारचे एकमेव शासकीय महाविद्यालय आहे. अन्नतंत्र विषयातील बी.टेक, एम.टेक, पीएचडी हे अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत.

सन २०१० पासून ‘बी.टेक’ च्या अंतिम वर्षाच्या (७ वे सत्र) विद्यार्थ्यांसाठी कार्यानुभवातून शिक्षण (एक्सप्रियन्सिएल लर्निंग प्रोग्रॅम-ईएलपी) हा उपक्रम राबवला जातो. दरवर्षी जून ते ऑक्टोबर हा त्याचा कालावधी असतो. त्या अंतर्गत फळे- भाजीपाला व बेकरी- कन्फेक्शनरी हे दोन मोड्यूल्स चालविले जातात.

फळे- भाजीपाला प्रक्रिया

यात विद्यार्थ्यांना स्थानिक परिसरातील फळे, भाजीपाला व शेतमालावर आधारित प्रक्रिया उत्पादने निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. त्या हळद पावडर, लोणचे, आंबा, लिंबू, मिरची आदींचे लोणचे, टोमॅटो सॉस, केचप, आवळा कॅण्डी व ज्यूस तसेच सर्व फळांचे ज्यूस, स्कॅश, आले- लसूण पेस्ट, विविध प्रकारचे पापड, मसाले आदींचा समावेश असतो. स्थानिक परिसरात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या सोयाबीनवर प्रक्रिया करूनही सोया पनीर, मिल्क, स्नॅक्स, सॉस आदी पदार्थ तयार केले जातात. नवसंशोधित उत्पादनांचाही त्यात समावेश असतो.

बेकरी- कन्फेक्शनरी विभाग

यातील बेकरी विभागांतर्गत गहू, मैदा, नाचणी, विविध तृणधान्यांपासून ब्रेड बनविले जातात. शिवाय विद्यार्थी टोस्ट, खारी, क्रिमरोल, क्रॅकर, प्री व प्रो बायोटिक, उच्च पोषणमूल्ययुक्त पदार्थांची निर्मिती करतात. कन्फेक्शनरी युनिट अंतर्गत चॉकलेट्स, शेंगदाणा, चिक्की, आइस्क्रीम, श्रीखंड आदीसह विविध मिठाई देखील विद्यार्थी बनवितात.

Student Entrepreneurship
Food Processing Success Story: १० हजारांपासून १० लाखांपर्यंत! विजयमाला देशमुख यांचा उद्योग प्रवासाचा यशोगाथा

विद्यार्थ्यांमध्ये होते कौशल्यवृद्धी

सन २००९-१० मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) दिलेल्या निधीतून इमारत बांधकाम, फळे- भाजीपाला प्रक्रिया, पॅकिंग यंत्रांसह अन्य साहित्याची खरेदी करणे शक्य झाले. त्यातून अद्ययावत ‘ईएलपी युनिट’ उभारण्यात आले. कार्यानुभावतून शिक्षण-प्रशिक्षण उपक्रमात (हॅन्ड्‌स ऑन ट्रेनिंग) २०१० ते २०२४ या कालावधीत ७०० ते ७५० विद्यार्थी सहभागी झाले. कोरोना- लॉकडाउनमध्ये हा उपक्रम काही काळ बंद ठेवावा लागला. विद्यापीठ प्रशासनाकड़ून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार व मागणीनुसार सुमारे एक ते दोन लाखांच्या फिरत्या व त्यात प्रत्येक विद्यार्थ्याला सुमारे २५०० रुपये भांडवलाची सोय आहे.

उत्पादने निर्मितीसाठी कच्चा मालाची खरेदी विद्यार्थी बाजारातून करतात. वैयक्तिक किंवा गटांना निर्मिती प्रात्यक्षिकांसह पॅकिंग, लेबलिंग यांचे प्रशिक्षण मिळते. नवे संशोधन करून बनविलेल्या उत्पादनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळते. उपक्रमांतर्गत कमवा व शिका योजनेचा समावेश असून गरजू विद्यार्थी किंवा गटांना १० हजार रुपयांपर्यंत भांडवल दिले जाते. त्यावर एक टक्का व्याजाची आकारणी केली जाते. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना उत्पादनाची निर्मिती करून विक्री करणे शक्य होते. त्यातून शैक्षणिक साहित्य, खाणावळ आदी खर्च भागतो. तसेच आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होतो.

Student Entrepreneurship
Women Food Processing Business: महिलांना अन्नप्रक्रिया उद्योगातील संधी

विक्री- मार्केटिंगचे कौशल्य

उपक्रमाद्वारे मार्केटिंग- विक्रीसाठी आवश्‍यक उद्योजकीय कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात होते. उपक्रमाचा कालावधी चार महिन्यांचा असतो. त्या कालावधीत उत्पादनांची विक्री विद्यार्थी घरोघर जाऊन करतात. कृषी विद्यापीठ, महाविद्यालय परिसरात कृषी प्रदर्शने, शेतकरी मेळावे आदींच्या निमित्ताने स्टॉल उभारून देखील उत्पादनांची विक्री होते. ‘ईएलपी’ प्रकल्प खाजही भागीदारी तत्त्वावर चालविला जातो.

त्यामुळे उपक्रम संपल्यानंतर देखील उर्वरित काळासाठी ब्रेड, खारी, क्रिमरोल आदी उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध असतात. विक्रीतून झालेल्या नफ्यात प्रत्येकी ५० टक्के हिस्सा विद्यार्थी व विद्यापीठाचा असतो.

दरवर्षी चार महिन्याच्या कालावधीत सुमारे २५ ते ३५ हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो. आजवर फळे प्रक्रिया व बेकरी उत्पादने विक्री आदींच्या माध्यमातून सुमारे २२ लाखांचे उत्पन्न विद्यापीठाला मिळाले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योगही सुरू करून आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

शेतकरी, महिला गटांना प्रशिक्षण

कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी मिश्रा, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.राजेश क्षीरसागर यांचे मार्गदर्शन उपक्रमास मिळते. त्या अंतर्गत ‘ईएलपी मोड्युल’चे प्रभारी अधिकारी डॉ.कैलाश गाढे, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. भारत आगरकर, डॉ.अनुप्रिया जोशी आदींसह प्राध्यापकवृंद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

हैदराबाद येथील नार्म या संस्थेअंतर्गत पाच राज्यातील उद्योजक, नवउद्योजकांना प्रशिक्षण देण्यात येते. जिल्हा उद्योग केंद्र व कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकरी गट, महिला स्वयंसाह्यता गट यांच्यासाठी प्रक्रिया, मसाले निर्मिती आदींचे प्रशिक्षण आयोजित केले जाते. अभ्यास सहलीच्या माध्यमातून आजही कृषी महाविद्यालये, शाळा तसेच शेतकरी या प्रकल्पाला भेटी देऊन मार्गदर्शन घेत असतात.

‘कॉमन इनक्युबेशन सेंटर’

अन्नतंत्र महाविद्यालयात केंद्र पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अत्याधुनिक सामाईक सुविधा अन्न प्रक्रिया केंद्र (कॉमन इनक्युबेशन सेंटर) उभारण्यात आले आहे. एक जिल्हा एक उत्पादन या योजनेतून येथे उसापासून बाटलीबंद रस, गूळ, गूळ पावडर, त्याच्या वडया, काकवी आदींची निर्मिती केली जात आहे. सन २०२४ मध्ये कार्यान्वित झालेले हे केंद्र आजही, सार्वजनिक भागीदारी पद्धतीने चालविले जाते.

येथे मसाले निर्मिती व प्रक्रिया केंद्रही स्थापन करण्यात आले आहे. केंद्राद्वारे युवावर्ग, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला, स्वयंसाह्यता गट, नव उद्योजकांना प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याद्वारे उत्पादने निर्मिती, पॅकेजिंग, अन्न तपासणी सुविधा यांचा उपयोग करता येणार आहे. त्याद्वारे उद्योजक तयार होण्यास वाव मिळून आपल्या उत्पादनाचा ब्रँड विकसित करणेही शक्य होणार आहे.

डॉ. कैलास गाढे ९४२१४५९४६१

प्रभारी अधिकारी (ईएलपी) अन्नतंत्र महाविद्यालय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com