Smart Farming Model : दुष्काळाला अनुकूल ‘स्मार्ट’ शेतीचे मॉडेल

Horticulture : संपूर्ण ५० एकरांत कोणतेही हंगामी पीक न घेता दुष्काळी स्थितीचा विचार करून पाच फळपिके निवडून त्यातून वर्षभर ताजे उत्पन्न मिळत राहील अशी पद्धती व सोईसुविधा आकारास आणल्या आहेत.
Smart Agriculture
Smart AgricultureAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : वडवाळी (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील राम व श्‍याम या काळे बंधूंची ५० एकर शेती आहे. त्यांचे वडील नंदलाल जिल्हा दूध संघात पूर्वीपासूनच सक्रिय आहेत. कुटुंबाने शेतीला दुग्ध व्यवसायाची मोठी जोड देऊन दुष्काळाला अनुकूल व्यावसायिक, एकात्मिक असे ‘स्मार्ट शेती’ चे मॉडेल उभे केले आहे.

वर्षभर ताजा पैसा येत राहावा अशी तजवीज त्यातून केली आहे. सन २००५ च्या दरम्यान एमएबीएडपर्यंत शिक्षण घेतलेले राम शेतीत उतरले. रोजगार मागण्याऐवजी तो देणारा व्हावा असे ध्येय ठेवले. हळूहळू वडिलांनीही कुटुंबाच्या शेतीची जबाबदारी त्यांच्याकडे. तर बंधू श्‍याम यांच्याकडे दुग्ध व्यवसायाची जबाबदारी सोपवली.

दुष्काळाला अनुकूल पीक पद्धती

काळे यांनी शेतीत बदल करताना हंगामी पिके घेणे थांबवले. त्याऐवजी फळबागकेंद्रित शेतीवर भर दिला. आज संपूर्ण ५० एकरांत केवळ फळबागा असून, सीताफळ १० एकर, मोसंबी २० एकरकेलर आंबा व ड्रॅगन फ्रूट प्रत्येकी ५ एकर अशी मुख्य पिके आहेत. ही पीकपद्धती निवडण्यामागेराम यांनी ‘स्मार्ट’ विचार केला आहे. ते सांगतात, की गोदावरीच्या पाण्याचा स्रोत असला, तरी काही वर्षे दुष्काळाची जातात.

अनेक वेळा दुष्काळाचे फटके सहन केले आहेत. अशावेळी नुकसान होतेच. शिवाय पुढील काळासाठी भांडवलही हाती राहात नाही. त्यामुळे कमी पाण्यात, कमी देखभालीत उत्पादन चांगले देऊ शकतील, तग धरतील अशीच पिके घेण्याचा विचार केला. अर्थात बंगळूर, दिल्ली, छत्तीसगड, आसाम आदी भागांतील बाजारपेठांना भेटी देऊन विविध फळांचे दर, अर्थशास्त्र, मागणी यांचा अभ्यास राम यांनी केला. त्यानंतरच लागवडीचे नियोजन केले.

वर्षभर ताजे उत्पन्न

राम सांगतात, की केसर आंब्याचे उत्पादन साधारण १५ मार्च ते एप्रिलमध्ये सुरू होते. आंबा संपला की ड्रॅगन फ्रूट जुलै ते १५ ऑक्टोबरपर्यंत उत्पादन देते. ते पीक संपले की सीताफळ व मोसंबी उत्पादन देऊ लागतात. ही पिके संपत येतात तोपर्यंत पुन्हा आंब्याचे उत्पादन व आर्थिक चक्र वर्षभर सुरू राहते. एका पिकातील किंवा एका हंगामातील पैसा दुसऱ्या हंगामात उपलब्ध होतो. दुष्काळी वर्ष आले तरी कोणते ना कोणते पीक साथ देऊन जाते.

जागेवरच मिळवले मार्केट

सर्व फळांना जागेवरच मार्केट तयार केले आहे. सीताफळाचे बागेच्या वयाप्रमाणे एकरी सहा ते सात टनांपर्यंत उत्पादन तर किलोला ६० रुपयांपासून ते १२० रुपयांपर्यंत दर मिळतो. केलर आंब्याचे एकूण क्षेत्रातून सुमारे १२ टनांपर्यंत उत्पादन मागील वर्षी मिळाले. ७५ रुपये प्रति किलो दराने जागेवरच विक्री केली.

मोसंबीचे दहा एकरांत ७० टनांपर्यंत उत्पादन व किलोला ३० ते ५० रुपयांपर्यंत दर मिळवला आहे. सन २०१४ च्या सुमारास डाळिंबही होते. त्याची युरोपात निर्यात करण्यातही यश मिळवले आहे. ८०, १२० रुपयांपासून १४० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळवला आहे. डाळिंब बाग जुनी झाल्याने नव्या लागवडीचे प्रयोजन आहे.

Smart Agriculture
Agriculture Success Story : भाजीपाला, दुग्धोत्पादनात ओळख सावरगावतळची!

ड्रॅगन फ्रूटची साथ

दुष्काळात ड्रॅगन फ्रूटची चांगली साथ काळे यांना लाभत आहे. सन २०१८ मध्ये अडीच एकरांत आतून व बाहेरून पांढरे असलेल्या वाणाची लागवड केली होती. त्यातून एकरी ३ ते ४ टनांपर्यंत उत्पादन व ८० ते १२० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळवला आहे.

मात्र बाजारात जंबो रेड फळाला अधिक मागणी व दर असल्याचे पाहून संपूर्ण पाच एकरांत त्याचीच लागवड आहे. काही जागेवरून, तर काही सोलापूरच्या बाजारात विक्री केली आहे. ६० ते १३० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे.

दुग्ध व्यवसायाची जोड

  • राम यांचे वडील नंदलाल यांनी गावात सहकारी संस्था स्थापन करून गावातील दुग्धोत्पादकांसाठी गावातच संकलन केंद्र सुरू केले.

  • काळे यांच्याकडे २००२ मध्ये २० गायी होत्या आजमितीला संख्या ३० ते ३५ पर्यंत.

  • स्वतःकडील व शेतकऱ्यांकडील मिळून ६०० लिटरपर्यंत दुधाचा जिल्हा दूध संघाला पुरवठा.

  • वर्षाला ७० ते ८० ट्रॉली शेणखतही मिळते. गरजेनुसार विकत घ्यावे लागते.

Smart Agriculture
Agriculture Success Story : शेतीसारखे समाधान कुठेच अनुभवले नाही...

शेतकरी कंपनीत सक्रिय

  • वडील अध्यक्ष असलेल्या आपेगाव शेतकरी उत्पादक कंपनीत राम तसेच आंबा, मोसंबी, सीताफळ पिकांतील सुमारे २४० शेतकरी सहभागी.

  • कंपनीच्या माध्यमातून मोसंबी ग्रेडिंग, पॅकिंग, वॅक्सिंग युनिटची उभारणी.

  • शंभर टन क्षमतेचे कोल्ड स्टोअरेज उभारण्यात येत आहे.

  • पुढील काळात फळपिकावर प्रक्रिया करून स्वतःबरोबर परिसरातील शेतकऱ्यांचाही विकास करण्याचे काळे यांचे ध्येय.

काळे यांच्या शेतीतील ठळक बाबी

  • गोदावरी नदीवरून तीन पाइपलाइन्स, प्रत्येकी दोन विहिरी व बोअरवेल्स. प्रत्येकी दीड कोटी लिटर क्षमतेची दोन शेततळी

  • प्रयोगशील शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन. बागांना भेटी, प्रशिक्षणांना उपस्थिती.

  • सुमारे सात पुरुष व २० महिला मजुरांना कायमस्वरूपी रोजगार

  • शेतात भ्रमंतीसाठी रस्ते. बांधाला नारळ लागवड. त्यातून अर्थार्जन.

  • संपूर्ण शेती ठिबकखाली.

  • मागील वर्षी छत्रपती संभाजीनगर येथील ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनात काळे यांच्या कार्याचा झाला सन्मान.

राम काळे ९४२२२२७१८१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com