Modern Farming : सोलापूर ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन अंतर्गत ‘आकांक्षित आणि शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमध्ये ग्रामीण उपजीविका बळकटीकरण’ या प्रकल्पाखाली सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये एकूण १२ कृषी अवजार बँका स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी नोंदणीकृत समुदाय आधारित संस्थांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली आहे.
या योजनेतून माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या चार तालुक्यांमध्ये प्रति तालुका ३ याप्रमाणे १२ कृषी अवजार बँका उभारल्या जातील. यासाठी अर्जाचा नमुना व मार्गदर्शक सूचना संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात २४ ऑगस्ट २०२६ पासून उपलब्ध आहेत.
याशिवाय व्हीएसटीएफच्या (www.mvstf.org) आणि जिल्हा परिषद सोलापूरच्या (www.zpsolapur.gov.in) संकेतस्थळावरूनही अर्ज डाऊनलोड करता येतील.
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२६ ते २१ सप्टेंबर २०२६ असा असून, कार्यालयीन वेळेत अर्ज जमा करता येतील. इच्छुक नोंदणीकृत समुदाय आधारित संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.
या योजनेत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पूर्णतः किंवा अंशतः बदल करण्याचे अथवा योजना रद्द करण्याचे सर्व अधिकार ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनकडे राखीव ठेवण्यात आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.