Maharashtra Rain : विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट

IMD alert : गुरुवारी राज्याच्या आणखी काही भागातही पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
Maharashtra Rain
Maharashtra RainAgrowon
Published on
Updated on

Monsoon alert : हवामान विभागाने आज विदर्भ आणि कोकणात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. काही भागात चांगल्या सरी झाल्याही. तसेच अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली होती. उद्या म्हणजेच गुरुवारी राज्याच्या आणखी काही भागातही पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Rain
Maharashtra Rain: सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पाऊस कसा राहू शकतो? | Agrowon| ॲग्रोवन

हवामान विभागाने उद्या विदर्भ आणि मराठवड्यात पावसाचा अंदाज दिला. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये ठिकाठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदरा पावसाचा अंदाज दिला. तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. आहे.

शुक्रवारी राज्याच्या आणखी काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी संपूर्ण विदर्भासह मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच संपूर्ण खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक आणि नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर राज्याच्या इतर भागातही विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com