Stormy Rain : वारा, पावसाचे संकट कायम; शेतीमाल वाचविण्याची लगबग

निफाडमधील शिरवाडी परिसरात वादळी वारा, हलका पाऊस झाल्याने द्राक्ष उत्पादकांसमोर अडचणी निर्माण झाल्या.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Nashik Rain : जिल्ह्यात सोमवारनंतर (ता. १३) ढगाळ वातावरण (Cloudy Weather) कायम असल्याने काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती डोक्यावर घोंगावत आहे. त्यातच नांदगाव, देवळा, सिन्नर तालुक्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम सरी बरसल्या.

तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. १४) सायंकाळी पेठ, दिंडोरी, नांदगाव तालुक्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका बसला. त्यामुळे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा पिकांचे पावसात भिजून नुकसान झाले.

तर आंबा पिकांचे अगोदरच मोठे नुकसान असताना पुन्हा वाचलेला मोहर झडून लहान कैऱ्या गळून पडल्या. त्यामुळे नुकसान वाढतेच असल्याने शेतकऱ्यांनी ढगाळ वातावरणाची धास्ती घेतली आहे.

जिल्ह्यात अनेक भागांत गहू सोंगणीवर आला असून काढणीला वेग आला आहे. तर अंतिम टप्प्यात लेट खरीप कांदा व नव्या उन्हाळा कांद्याची काढणी सुरू झाली आहे.

Rain Update
Unseasonal Rain : नांदेड येथे अवकाळी पावसाची शक्यता

मात्र पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे पेठ तालुक्यातील करंजाळी, गावंधपाडा परिसरातील गहू आडवे झाले आहेत. तर सोंगणीला आलेला हरभरा व कांदा पावसात भिजला. अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी असले तरी वादळ अधिक असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.

वादळ जास्त असल्याने आंबा पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकरी यशवंत गावंडे यांनी सांगितले.

दिंडोरीतील चंडीकापूर परिसरात अनेक ठिकाणी गहू पीक आडवे झाले. कळवण तालुक्यात मोकभणगी परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळ तसेच काही ठिकाणी पाऊस पडला. जिल्ह्यात ढगाळ वातावरणआमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

संभाव्य नुकसान टाळण्यासाठी गहू काढणीची धावपळ सुरू आहे. नांदगाव तालुक्यात रात्रीनंतर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची कांदा झाकण्यासाठी धावपळ झाली.

Rain Update
Khandesh Rain Update : खानदेशात अनेक भागांत वादळी पाऊस

द्राक्ष उत्पादकांमध्ये धाकधूक

निफाडमधील शिरवाडी परिसरात वादळी वारा, हलका पाऊस झाल्याने द्राक्ष उत्पादकांसमोर अडचणी निर्माण झाल्या. काही ठिकाणी द्राक्षमण्यांना तडे गेल्याचे समोर आले आहे.

तर दिंडोरी तालुक्यातील तळेगाव परिसरात याच स्वरूपाचे नुकसान समोर आले. ढगाळ वातावरण कायम असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये धाकधूक आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com