Monsoon Update 2023
Monsoon Update 2023Agrowon

Monsoon Update 2023: माॅन्सून पुढे कधी सरकणार ? चक्रीवादळ काही तासात किनाऱ्यावर धडकणार?

Cyclone Biparjoy : बिपरजाॅय चक्रीवादळ सध्या किनाऱ्याच्या दिशेने प्रवास करत आहे. पुढील काही तासांमध्ये चक्रीवादळ जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे.
Published on

Cyclone Update : बिपरजाॅय चक्रीवादळ सध्या किनाऱ्याच्या दिशेने प्रवास करत आहे. पुढील काही तासांमध्ये चक्रीवादळ जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला. दुसरीकडे माॅन्सूनची वाटचाल अजही रखडलेली होती.

मॉन्सून ८ जून रोजी देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये डेरेदाखल झाला होता. त्यानंतर साधारणतः ७ जूनपर्यंत तळकोकणात येणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने दाखल झाला.

माॅन्सूनने सोमवारी कोकण, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये प्रगती केली होती. पण माॅन्सूनने तीन दिवसांपासून प्रगती केली नाही. माॅन्सून एकाच ठिकाणावर ठाण मांडून आहे.

आजही माॅन्सूनची सिमा रत्नागिरी, कोप्पाल, पुट्टापारथी, श्रीहरीकोटा, मालदा आणि फोरबेसगंज या भागात होती. पण १८ ते २१ जूनच्या दरम्यान माॅन्सून दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग, पूर्व भारत आणि शेजारच्या भागात प्रगती करु शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Monsoon Update 2023
Biporjoy Cyclone : ‘बिपॉरजॉय’ आज गुजरातला धडकण्याची शक्यता

बिपरजाॅय चक्रीवादळ आता अतितीव्र झाले आहे. ईशान्य अरबी समुद्रात घोंगावणारे हे अतितीव्र चक्रीवादळ उत्तर ईशान्य दिशेने ७ किलोमीटर प्रतितास या वेगाने पुढे सरकत आहे. गुजरातमधील जखाऊ बंदरापासून पश्चिम वायव्येला १७० किलोमीटरवर हे चक्रीवादळ आहे.

तर देवभुमी द्वारकेपासून २१० किलोमीटर, नालियापासून १९० किलोमीटर पश्चिम वायव्येला, पोरबंदरपासून पश्चिम वायव्येला २९० किलोमीटर आणि पाकिस्तानमधील कराचीच्या दक्षिणेला २६० किलोमीटर अंतरावर आहे.

बिपरजाॅय चक्रीवादळ सौराष्ट्र आणि कच्छ तसेच पाकिस्तानच्या सिमेच्या दिशेने प्रवास करत आहे. चक्रीवादळ आज सायंकाळी जखाऊ बंदराजवळ गुजरातमधील मंडावी आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यान किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे.

या भागात ११५ ते १२५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. तर अनेक भागात वादळी पाऊस पडत आहे. गुजरातमधील एक लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com