Maharashtra Rain Forecast : वादळी पावसाचा इशारा कायम

Maharashtra Rain Update : राज्यात पाऊस सुरू असतानाच ‘ऑक्टोबर हीट’चा चटका कायम आहे. सकाळी ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशीच स्थिती काही भागात पाहायला मिळत आहे.
Rain Forecast
Rain ForecastAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात पाऊस सुरू असतानाच ‘ऑक्टोबर हीट’चा चटका कायम आहे. सकाळी ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशीच स्थिती काही भागात पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.

पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २१) वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

रविवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.५ अंश तापमानाची नोंद झाली. परभणी, अकोला, वर्धा येथे अधिक तापमान नोंदले गेले. विदर्भासह राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला असल्याने अनेक ठिकाणी पारा ३० अंशांच्या पार आहे.

Rain Forecast
Maharashtra Heavy Rain : वादळी पावसाचा तडाखा सुरूच

राज्यात वादळी पावसाची हजेरी कायम असून, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. आज (ता. २१) राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.

रविवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.८, अहिल्यानगर ३२.१, जळगाव ३३.०, कोल्हापूर २९.६, महाबळेश्वर २७.२, मालेगाव ३१.२, नाशिक ३१.३, निफाड ३१.५, सांगली ३१.२, सातारा ३१.८, सोलापूर ३४.६, सांताक्रूझ ३३.७, डहाणू ३३.१, रत्नागिरी ३१.५, छत्रपती संभाजीनगर ३३.५, परभणी ३५.४, अकोला ३५.१, अमरावती ३३.४, भंडारा ३०.०, बुलडाणा ३०.२, ब्रह्मपुरी ३७.६, चंद्रपूर ३३.८, गडचिरोली ३२.६, गोंदिया ३३.८, नागपूर ३४.१, वर्धा ३५.०, वाशीम ३३.८, यवतमाळ ३२.२.

Rain Forecast
Khandesh Rain Update : धुळे, जळगावात पावसाचा फटका

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र निवळत असून, ही प्रणाली किनाऱ्यापासून दूर जात आहे. मध्य अंदमान समुद्रात चक्राकार वारे वाहत असून, या परिसरावर आज (ता. २१) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत (ता. २३) उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची संकेत हवामान विभागाने दिले आहेत. गुरुवारी (ता.२४) ही प्रणाली ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नंदुरबार, धुळे , जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड.

वाशीम : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com