Weather Update : राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा

Rain Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

Pune News : पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी राज्यात तडाखा दिला आहे. पावसाळी वातावरणामुळे उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. आज (ता. १२) राज्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती, वाशीम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, सातारा, नगर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ आकाशमुळे कमाल तापमानात घट झाली आहे. अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस, तर वाशीम येथे ४२ अंश आणि धुळे, मालेगाव, वर्धा येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

Weather Update
Weather Update : पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण

आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर मराठवाड्यापासून कर्नाटक, केरळ ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला सुरूवात झाली असून, आज (ता. १२) राज्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Weather Update
Weather Update : राज्यात वादळी पावसाचा इशारा

शनिवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३७.७, धुळे ४१.०, कोल्हापूर ३६.७, महाबळेश्वर २८.७, मालेगाव ४१.०, नाशिक ३७.३, निफाड ३७.०, सांगली ३४.९, सातारा ३६.७, सोलापूर ३९.०, सांताक्रूझ ३३.६, डहाणू ३३.९, रत्नागिरी ३४.०,

छत्रपती संभाजीनगर ३९.४, नांदेड ३९.८, परभणी ३९.४, अकोला ४२.५, अमरावती ४०.९, बुलढाणा ३९.२, ब्रह्मपूरी ३९.४, चंद्रपूर ३९.०, गडचिरोली ३८.२, गोंदिया ३६.६, नागपूर ३६.६, वर्धा ४१.०, वाशीम ४१.२, यवतमाळ ४०.०.

वादळी, गारपिटीचा पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पुणे, सातारा, लातूर, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशीम.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

४१ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४२.५, वाशीम ४१.२, धुळे ४१.०, मालेगाव ४१.०, वर्धा ४१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com