Monsoon 2025: यंदा जुनमध्ये साधारण पाऊस, खरिपातील पिके सामान्य; भेंडवळ घटमांडणीचा अंदाज

Bhendwal Tradition Prediction: यावर्षी जून महिन्यात असमतोल स्वरुपाचा पाऊस होणार असून उर्वरित तीन महिन्यात टप्याटप्प्याने पाऊस वाढत जाईल.
Bhendwal Tradition
Bhendwal Tradition Agrowon
Published on
Updated on

Buldana News : यावर्षी जून महिन्यात असमतोल स्वरुपाचा पाऊस होणार असून उर्वरित तीन महिन्यात टप्याटप्प्याने पाऊस वाढत जाईल. शिवाय अवकाळी पावसाचेही प्रमाण अधिक राहणार आहे. खरीप पीक काढणीच्या काळात पाऊस होणार असल्याने पिकांचे नुकसानही संभवते, असा अंदाज भेंडवळ येथील घटमांडणीतून समोर आला आहे.

भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर बुधवारी ३० एप्रिल रोजी झाली होती. त्यानंतर गुरुवारी सूर्योदयी या घटमांडणीचे अंदाज वर्तविण्यात आले.जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावात मागील साडे तीनशेपेक्षा अधिक वर्षांपासून अक्षय तृतियेला घटमांडणी केली जाते. रामचंद्र महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरु केली.

Bhendwal Tradition
Paus Andaj: वादळी पावसाची विदर्भात शक्यता; मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज

आजही त्यांच्या कुटुंबातील वंशज पुंजाजी महाराज वाघ ही मांडणी पुढे नेत आहेत. या घटमांडणीतून पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीते, पृथ्वीवर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज वर्तविले आहेत. मांडणीचे विश्लेषण सारंगधर महाराज वाघ यांनी माध्यमांसमोर केले.

यावर्षात कपाशीचे पीक सर्वसाधारण, ज्वारी, तूर, मूग, उडीद ही पिके साधारण राहतील. तिळाचे पीक चांगले दर्शविले आहे. भादली हे पीक रोगराईचे प्रतिक म्हणून घटात मांडणी केलेली असते. यावर्षी रोगराईचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता वर्तवले आहे. रब्बीत गहू, हरभऱ्याचे पीकही साधारण आहे. तेलवर्गीय पिकांचे उत्पादनही सर्वसामान्य येण्याची भाकीत दिले आहे.

Bhendwal Tradition
Heatwave Alert: मे महिन्यात उन्हाचा चटका कायम राहणार

असा आहे पावसाबाबत अंदाज

भेंडवळ घट मांडणीत पावसाचा अंदाज महत्वाचा राहतो. यावर्षी पावसाच्या पहिल्या म्हणजेच जून महिन्यात जेमतेम पाऊस राहील. जुलैमध्ये पावसाचा जोर वाढेल. जुनच्या तुलनेत अधिक पाऊस होईल. आॅगस्टमध्ये अधिक पाऊस आणि सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस होईल. सोबतच पुढील काळात अवकाळीचा जोरसुद्धा राहणार असल्याने काढणीला आलेल्या पिकांचे काही भागात नुकसान संभवते. खरीप हंगामात सुरुवातीला असमतोल स्वरुपाचा म्हणजेच काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी पाऊस होईल. यामुळे पेरणी करताना शेतकऱ्यांनी घाई करू नये. जमिनीत पुरेशी ओल आल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्लाही देण्यात आला.

यंदा नैसर्गिक आपत्ती

घटमांडणीची पाहणी करून इतरही भाकिते मांडण्यात आली. यात नैसर्गिक आपत्ती येतील, देशाला परकीय शत्रुचा त्रास संभवतो. संरक्षणाची बाजू सक्षम राहील. शिवाय आर्थिक परिस्थिती बिकट राहू शकते, असेही म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com