Cyclone Dana : ‘डाना’ चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगालमधील लाखो लोकांचे स्थलांतर; विमान, रेल्वेसेवा रद्द; शाळाही बंद

Cyclone Dana Updates : बंगालच्या उपसागरात ‘डाना’ चक्रीवादळाची निर्मिती झाली असून ओडिशा आणि पश्चिम बंगाल प्रशासन आधीच सतर्क झाले आहे.
Cyclone Dana
Cyclone DanaAgrowon
Published on
Updated on

Pune News : बंगालच्या उपसागरात ‘डाना’ चक्रीवादळाची निर्मिती झाली असून ते ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे झेपावत आहे. चक्रीवादळाच्या आगमनापूर्वी ओडिशातील समुद्राने उग्र रूप धारण केले आहे. यामुळे येथे धामरा बंदर दरम्यान ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर ते कधीही ओडिशावर धडकू शकते, असा संकेतही देण्यात आला आहे.

बीचवर कलम १४४ लागू

‘डाना’ चक्रीवादळ आसाममध्ये गुरूवार (ता.२४) किंवा शुक्रवारी (ता.२५) मध्यरात्री ते सकाळच्या दरम्यान धडकू शकते. तसेच याचा फटका पुरी आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याजवळ देखील बसू शकतो. यापूर्वी येथील बीचवर कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच खाडीवरील पुलांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

Cyclone Dana
Dana Cyclone : बंगालच्या उपसागरात ‘डाना’ चक्रीवादळ

'डाना'पूर्वी लाखो लोकांचे स्थलांतर

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, ओडिशा सरकार १४ जिल्ह्यांतील ३ हजार गावांमधून १० लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर केले आहे. तसेच बंगालमध्ये देखील सुमारे १ लाख ३० हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर अन्न, पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

सुरक्षा विभाग सज्ज

चक्रीवादळ ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कधीही धडकू शकते. त्यामुळे एसडीआरएफसह जिल्हा प्रशासनाने पुरी समुद्रकिनाऱ्यावरून लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. तर ओड्राफ्ट, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी वादळाच्या पार्श्वभूमीवर किनारी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. लोकांना वीज आणि पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी आधीच तयारी करण्यात आली आहे.

Cyclone Dana
Dana Cyclone : `दाना`चक्रीवादळ कुठे धडकणार ? राज्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज

सर्व विभाग, अधिकारी तयार : उपमुख्यमंत्री

ओडिशाचे उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंग देव यांनी डाना चक्रीवादळावरून माहिती देताना, सरकार पूर्णपणे तयार असून संबंधित विभागांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री, नगर मंत्री, महसूल मंत्र्यांसह प्रशासन चक्रीवादळाचा मागोवा घेत आहेत. यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री देव यांनी केले आहे.

कोणार्क मंदिर दर्शनासाठी बंद

भारतीय हवामान विभागाचे मृत्युंजय महापात्रा यांनी देखील यावरून ओडिशा, जगतसिंगपूर, केंद्रपारा, बालासोर आणि भद्रक या चार जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा अधिक प्रभाव पडेल, असे म्हटले आहे. या जिल्ह्यांसह पुरी, खुर्दा, कटक, मयूरभंज, केंदुझार आणि ढेंकनाल या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान चक्रीवादळ सध्या पारादीपपासून २६० किलो मीटर अंतरावर असून ते सागर बेटापासून २९० किलो मीटर अंतरावर आहे. यामुळे समुद्र खवळला आहे. तर मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे येथे झाडे उन्मळून पडत आहेत. तर वाऱ्याचा वेग देखील वाढत आहे. यामुळे कोणार्क मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.

ओडिशामध्ये १८२ टीम

डाना चक्रीवादळावरून ओडिशामध्ये बचाव कार्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. चक्रीवादळाशी मुकाबला करण्यासाठी बचाव सेवांच्या १८२ टीम अलर्टवर ठेवण्यात आल्या असून यात २००० लोक आहेत. यामुळे चक्रीवादळ आल्यास बाधीत होणाऱ्या १४ जिल्ह्यांमध्ये टीम पाठवली जाईल, असे अग्निशमन सेवा महासंचालक डॉ. सुधांशू सारंगी म्हणाले. तसेच एनडीआरएफच्या २० टीम राज्य आपत्ती दलाचे ४०० कर्मचाऱ्यांसह वनविभागाच्या टीमही देखील बोलावण्यात आल्याचे महासंचालक सारंगी यांनी सांगितले आहे.

ओडिशात शाळा बंद, उड्डाणेही रद्द

दरम्यान ओडिशाच्या १४ जिल्ह्यांमध्ये २५ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गंजम, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक, बालासोर, मयूरभंज आणि कटक या जिल्ह्यांसह इतर ६ जिल्ह्यांतील शाळा तीन दिवस बंद ठेण्यात येणार आहेत. डाना चक्रीवादळाचा भुवनेश्वरलाही फटका बसण्याची शक्यता असल्याने २४ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर सकाळी ९ वाजेपर्यंतची सुमारे ४५ उड्डाणे रद्द केल्याचे प्रधान यांनी सांगितले आहे.

रेल्वे, विमान आणि शाळांना फटका

डाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नऊ जिल्ह्यांतील सरकारी शाळा २६ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवल्या जातील, अशी घोषणा केली आहे. तर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पूर्व रेल्वेने २५ ऑक्टोबर रोजी हावडा विभागातील एकूण ६१ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तर कोलकाता विमानतळ प्रशासनाने गुरूवार (ता.२४) संध्याकाळ ६ वाजल्यापासून २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडियाने फ्लाइट पुन्हा शेड्यूल करण्यासाठी https://airindia.com/in/en/manage/self-reaccomodation.html साईट उपलब्ध करून दिली आहे. तसेच इतर माहितीसाठी 01169329333 / 01169329999 वर कॉल करा, असे प्रवाशांना आवाहन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com