Maharashtra Summer Heat : तापमानाचा पारा ३५ अंशापार ; उन्हाचा चटका वाढणार

Weather Update Maharashtra : राज्यात कमाल तापमान पस्तिशीपार असल्याने उन्हाचा चटका तीव्र होत आहे. कमान तापमानात चढ-उतार होत असल्याने पहाटे गारठा कायम असला, तरी दुपारच्या वेळी चांगलाच उकाडा वाढत आहे.
Heat Wave
Summer Heat Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात कमाल तापमान पस्तिशीपार असल्याने उन्हाचा चटका तीव्र होत आहे. कमान तापमानात चढ-उतार होत असल्याने पहाटे गारठा कायम असला, तरी दुपारच्या वेळी चांगलाच उकाडा वाढत आहे.

राज्याच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Heat Wave
Weekly Weather: हिवाळी हंगाम अस्ताच्या मार्गावर; महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल

वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १२० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह वाहत आहेत. रविवारी (ता. १६) हरियानाच्या रोहतक येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Heat Wave
Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा तडाखा! तापमानाचा पारा ३६ अंशांवर

तर राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी किमान तापमान १० ते २० अंशांच्या दरम्यान होते.

राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून, रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूरसह, सांगली, जेऊर, सांताक्रूझ, परभणी, अकोला येथे ३६ अंश व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात तब्बल १५ ते २३ अंशांची तफावत दिसून येत आहे. आज (ता. १७) कमाल आणि किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. १६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---कमाल---किमान

पुणे---३५.५---१२.८

अहिल्यानगर---३५---११.७

धुळे---३५---९.६

जळगाव---३४---११

जेऊर---३६---१४

कोल्हापूर---३५.२---१९.५

महाबळेश्‍वर---३१---१७.६

मालेगाव---३२.८---१४.४

नाशिक---३४.९---११.६

निफाड---३३.५---८.३

सांगली---३६.८---१६.८

सातारा---३५.२---१५.२

सोलापूर---३७.८---१८

सांताक्रूझ---३६.१---१७.४

डहाणू---३२.२---१७

रत्नागिरी---३३.६---१९.१

छत्रपती संभाजीनगर---३५.४---१६

धाराशिव---३४.२---१६.१

परभणी---३६---१६

परभणी (कृषी)---३३.९---१४.३

अकोला---३६.८---१५.८

अमरावती---३५.२---१४.५

भंडारा---३२.६---१६.२

बुलडाणा---३४.३---१७.८

ब्रह्मपुरी---३५.२---१५

चंद्रपूर---३४.६---निरंक

गडचिरोली---३२.२---१३.४

गोंदिया---३२.२---१५.२

नागपूर---३५.२---१४.८

वर्धा---३५---१६.२

वाशीम---३३.६---१९

यवतमाळ---३५.२---१६.३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com