

Pune News : पावसाला पोषक हवामान होताच राज्याच्या कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. आज (ता. १३) कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधारेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर रत्नागिरी जिल्ह्यात खबरदारीचा इशारा (रेज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भात कमाल तापमान वाढल्याने पारा ४४ अंशांच्या जवळ गेला होता. मात्र पावसाला पोषक हवामान होताच तापमानाचा पारा वेगाने घसरून पुन्हा चाळीशीच्या खाली आला आहे. गुरुवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३९.८ अंश तापमानाची नोंद झाली. अकोला येथे ३९ अंश तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात तापमान ३९ अंशांच्या खाली आले होते. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.
आजपासून (ता. १३) राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांसह उर्वरित राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
विदर्भात उद्यापासून मॉन्सूनची प्रगती शक्य
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्रातील मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागांतील २६ मे रोजी प्रगती केल्यानंतर वाटचाल थांबवली होती. गुरुवारी (ता. १२) मॉन्सूनची वाटचालीची सीमा ‘जैसे थे’ होती. वाटचालीस पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. १४) विदर्भासह, छत्तीसगड आणि ओडिशा राज्यांच्या काही भागात मॉन्सूनची चाल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
गुरुवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---३०.७---२१.५
अहिल्यानगर---३१.०---२०.५
धुळे---३७.०---२४.२
जळगाव---निरंक---२४.०
जेऊर---३०.५---२०.०
कोल्हापूर---३२.०---२२.९
महाबळेश्वर---२३.८---१८.२
मालेगाव---३४.६---२२.४
नाशिक---३०.३---२४.०
निफाड---३२.५---२३.७
सांगली---३२.८---२२.९
सातारा---३१.८---२१.०
सोलापूर---२८.९---२३.६
सांताक्रूझ---३३.५---२८.०
डहाणू---३३.३---२८.४
रत्नागिरी---३२.६---२५.५
छत्रपती संभाजीनगर---३३.२---२३.६
धाराशिव---निरंक---२०.०
परभणी---३१.१---२३.०
परभणी (कृषी)---२९.६---२२.५
अकोला---३९.४---२६.५
अमरावती---३९.८---२६.३
भंडारा---३७.०---२५.०
बुलडाणा---३३.२---२५.०
ब्रह्मपुरी---३७.८---२५.९
चंद्रपूर---३७.०---२२.६
गडचिरोली---३५.२---२५.२
गोंदिया---३७.८---२८.०
नागपूर---३७.६---२८.२
वर्धा---३७.०---२८.४
वाशीम---३६.०---२५.४
यवतमाळ---३८.४---२६.६
मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : रत्नागिरी.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड.
विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशीम, वर्धा, भंडारा, यवतमाळ.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.