Monsoon Rain Alert: राज्यात ३ दिवस पावसाचा अंदाज; विदर्भ, कोकणातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Monsoon Rain Forecast: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने पुढील ४८ तासांत माॅन्सून विदर्भासह देशातील आणखी काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

Pune News: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने पुढील ४८ तासांत माॅन्सून विदर्भासह देशातील आणखी काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनची सिमा मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट परिसरात आहे. आता माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान होत आहे. त्यामुळे माॅन्सूनची वाटचाल पुन्हा सुरु होणार असून पुढील ४८ तासांत माॅन्सून विदर्भातील आणखी काही भागात प्रगती करेल. तसेच छत्तीसगड आणि ओडिशातील काही भागातही माॅन्सून चाल करेल, असा अंदाज हवामान विबागाने दिला.

Monsoon Rain
Vidarbha Weather: पावसाअभावी विदर्भाची होरपळ

राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुढील ३ दिवस पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर २ दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. 

Monsoon Rain
Monsoon Rain Update: विदर्भात मुसळधारेचा अंदाज; राज्यात काही भागात पावसासाठी पोषक हवामान

विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्टही हवामान विभागाने दिला. तसेच मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com