Monsoon
MonsoonAgrowon

Monsoon 2025: मॉन्सून उंबरठ्यावर! केरळमध्ये रविवारपर्यंत आगमन होण्याची शक्यता

IMD Forecast: यंदाचा मॉन्सून वेळेपेक्षा जलद असून रविवारपर्यंत (२५ मे) केरळात धडकण्याची शक्यता वर्तवली आहे. दक्षिण भारतात पावसाची चाहूल लागली असून अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.
Published on

Pune News: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास यंदा वेगाने सुरू आहे. मॉन्सूनचे प्रवाह बळकट झाल्याने रविवारपर्यंत (ता. २५) मॉन्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, मॉन्सूनची सोमवारपर्यंत (ता. १९) झालेली वाटचाल मंगळवारी (ता. २०) कायम होती.

यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला. शनिवारपर्यंत (ता. १७) संपूर्ण अंदमान -निकोबार बेट समूह व्यापला असून, बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली आहे. अरबी समुद्रातून चाल करत मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागांसह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला होता.

Monsoon
Monsoon Update: खूशखबर; माॅन्सून ५ दिवसांत केरळमध्ये येणार

सोमवारी (ता. १९) चाल करत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागांसह श्रीलंकेच्या बऱ्याचशा भागापर्यंत मजल मारली आहे. बंगालच्या उपसागरातही आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

Monsoon
Monsoon Update: मॉन्सूनची चाल सुरूच; श्रीलंकेचा बराचसा भाग व्यापला

मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील चार दिवसांत संपूर्ण मालदीव, कोमोरीन उर्वरित भागांसह, लक्षद्वीप, केरळ, तमिळनाडूसह, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि पूर्वोत्तर राज्याच्या काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेत

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत आज (ता. २१) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत (ता. २२) या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उत्तरेकडे जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com