Maharashtra Rain : उद्यापासून विदर्भात पावसाचा अंदाज; चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीटीचाही इशारा

Weather Forecast : काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते, अशीही शक्यता आहे. तर मंगळवारी मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : हवामान विभागाने उद्यापासून विदर्भातील काही भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते, अशीही शक्यता आहे. तर मंगळवारी मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने शनिवारी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहू शकते, असाही अंदाज देण्यात आला.  

Weather Update
Weather Update : राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम

रविवारी अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर रविवारी यवतमाळ, गोंदीया, चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

Weather Update
Vidarbha Rain : विदर्भात पाऊस, गारपीटीचा इशारा; विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

सोमवारी अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर सोमवारी पावसासह चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये गारपीटीचीही शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

मंगळवारी विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांधील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मंगळवारी मराठवड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com