Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Rain Update: पुढील दिवसाचा अंदाज लक्षात घेता हलका ते मध्यम पावसासोबत हवामान दमट राहण्याची शक्यता आहे.
Nashik Rain
Nashik RainAgrowon
Published on
Updated on

Nashik News : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्राच्या अंदाजानुसार जिल्ह्यात १८ ते २१ ऑगस्टदरम्यान काही भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा ३० ते ४० किमी प्रति तास) दाट शक्यता आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या कृषी हवामान प्रक्षेत्र विभाग यांच्याकडून देण्यात आली आहे.

पुढील दिवसाचा अंदाज लक्षात घेता हलका ते मध्यम पावसासोबत हवामान दमट राहण्याची शक्यता आहे. तसेच आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील. कमाल तापमान ३०-३३ अंश सेल्सिअस व किमान तापमान २२-२४ अंश सेल्सिअस दरम्यान तसेच वाऱ्याचा वेग ११-१६ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे,

Nashik Rain
Rain Update : ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाची तूट

हवामान अंदाज लक्षात घेता पशुधन, कुक्कुट पक्षी आणि स्वतः मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटपासून संरक्षण करा. हलक्या पावसाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्याच्या पूर्व व मध्य विभागातील अवर्षणप्रवण, मैदानी क्षेत्रातील तूर, मूग व उडीद पिकाला संरक्षित पाणी द्यावे किंवा २ टक्के युरियाची फवारणी करावी.

मूग व उडीद पीक फूलकळी लागण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत गरजेनुसार शिफारशीत कीड व रोग नियंत्रणाचे उपाय करावेत. यासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एस एल ६२५ मि.ली.+पाण्यात मिसळणारे गंधक १२५० ग्रॅम ५०० लिटर पाणी प्रति हेक्टरी मिसळून फवारणी करावी.

तूर पिकात कीड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. जोरदार पावसामुळे भाजीपाला पिकांच्या बुंध्याजवळची माती वाहून गेली असल्यास, रोपांना मातीची भर द्यावी. वेगवान वाऱ्यांपासून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वेलींना आधार द्यावा. ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Nashik Rain
Monsoon Rain : पहिल्याच पावसात २१ तलाव फुटले

रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये पाने खाणारी अळी, तांबडे भुंगे, तुडतुडे, मावा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. गरजेनुसार पुढील फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी. खरीप कांदा पिकाचे लागवडीसाठी रानबांधणी करावी. रांगडा कांदा लागवडीसाठी बियाण्याची पेरणी करावी, असा पिकनिहाय कृषीहवामान सल्ला देण्यात आला आहे.

‘प्राण्यांची घ्यावी काळजी’

प्राण्यांना ट्रॅक्टर आणि इतर धातूंच्या शेतीच्या उपकरणांपासून दूर ठेवा. पावसापासून पशुधन व कुक्कुट पक्ष्यांचे साठवलेले पशुखाद्य, चारा व कडब्याचे प्लॅस्टिक/ताडपत्रीने झाकून संरक्षण करावे, असा पशुपालनविषयी सल्ला देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com