Monsoon 2023 : राज्यातील ९ जिल्ह्यांना पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'; राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार?

Maharashtra Rain Update : आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
Rain
RainAgrowon

IMD Orange Alert : राज्यात आजही पावसानं ठिकठिकाणी हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर सर्वत्र जोरदार पाऊस पडला. तसेच मराठवाडा विदर्भातही काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, विदर्भासह  मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

Rain
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस थांबला पण पाणी पातळीत होतेय वाढ, ७० बंधारे पाण्याखाली

राज्यात सर्वदूर पावसाच्या सरी पडतायत. सकाळपर्यंतच्या २४ तासात राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद जव्हार येथे ३१ सेमी तर मोखडा २४ सेंमी पावसाची नोंद झाली. तसेच नाशिक जिल्ह्यातील ओझरखेडा २६ सेंमी, हिंगोलीतील वसमत २३ सेंमी, तर चंद्रपुरमधील बल्लारपुर येथे सर्वाधिक ११ सेंमी पावसाची नोंद झाली. राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने धरणातील जलसाठयात वाढ झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी धरणक्षेत्र वगळता पावसाने बहुतांश ठिकाणी विश्रांती घेतली. राधानगरी धरण १०० टक्के भरलं आहे. हिंगोली जिल्हयातील ८ मंडळात जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ५७ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मात्र पूर परिस्थिती ओसरली आहे. सांगली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे.

Rain
Irai Dam : इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले ;चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती; प्रशासन अलर्ट मोडवर

मॉन्सूनचा आस असलेला पट्टा आज गंगानगर, नरनौल, ग्वाल्हेर, सिधी, अंबिकापुर, झारसुगुडा, चांदबलीपासून आग्नेय दिशाला पूर्वमध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्रसपाटीपासून ०.९ किलोमीटर उंचीवर आहे. उत्तर ओडीशा आणि शेजारी भागावर कमी दाब क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तर उत्तर ओडीशा आणि गंगेच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिति आहे. 

आज राज्यातील ९ जिल्ह्यांना काही भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि विदर्भातील चंद्रपुर गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात काही थकांनी काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

तसेच कोकणातील मुंबई, सिंधुदुर्ग, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकसह कोल्हापूर, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव त्याचबरोबर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपुर, वर्धा, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com