
Weather Update: महाराष्ट्रावर आज (२५) १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत ४५ मि.मी., रायगड जिल्ह्यात ३१ मि.मी. आणि ठाणे व पालघर जिल्ह्यांत २० ते २३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. चक्रीय वादळ गुजरातचे सीमेजवळ पोहोचेल. उद्यापासून शनिवारपर्यंत (ता. २६ ते ३१ मे) महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००२ हेप्टापास्कल इतके कमी राहण्यामुळे आठवडाभर सर्वच जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. कमाल व किमान तापमानात घसरण होईल. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होईल. आकाश पूर्णतः ढगाळ राहील.
धाराशिव, लातूर, बीड, बुलडाणा व सांगली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २० ते २२ कि.मी. राहील. बहुतांशी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भातील बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. मॉन्सूनचे आगमनासाठी वाऱ्याची दिशा अनुकूल बनेल.
प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १७ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २६ अंश सेल्सिअस राहील. तेथे अल्पशा प्रमाणात ‘ला-निना’ची स्थिती असल्याने आणि बंगालच्या उपसागराच्या आंध्र किनारपट्टीजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअस तसेच अरबी समुद्र व हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहण्यामुळे महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होऊन पावसाचा जोर कायम राहील.
मॉन्सूनची वाटचाल पाहता, सध्या श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरावरील अर्धा भाग व्यापलेला असून पुढील वाटचालीसाठी हवेचे दाब अनुकूल बनला झाल्याने मॉन्सून केरळात दाखल झाला आहे. त्यापुढील वाटचाल वेगाने होऊन तो १ जूनपर्यंत गोव्यात आणि ५ जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापेल असे सध्यातरी दिसून येत आहे.
कोकण
सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत आज (ता. २५) ४४ ते ४९ मि.मी., रायगड जिल्ह्यात ३१ मि.मी., ठाणे व पालघर जिल्ह्यांत २० ते २३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्व जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील. कोकणातील वाऱ्याची दिशा मॉन्सूनच्या आगमनासाठी योग्य आहे. वाऱ्याचा ताशी वेग ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १४ ते १६ कि.मी. रत्नागिरी जिल्ह्यात ताशी १८ कि.मी. आणि पालघर जिल्ह्यात ताशी १९ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, रायगड व पालघर जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस आणि पालघर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ८६ टक्के, तर रायगड जिल्ह्यात ९१ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८० टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज (ता.२५) नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ५ ते ९ मि.मी. पावसाची शक्यता असून त्या पुढेही आठवडाभर पावसाची शक्यता राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ११ कि.मी, तर धुळे व नाशिक जिल्ह्यांत ताशी १४ ते १५ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस व जळगाव जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे जिल्ह्यात ८७ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ९३ ते ९९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ७० ते ७९ टक्के, तर नाशिक जिल्ह्यात ८९ टक्के राहील.
मराठवाडा
आज (ता.२५) धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत ४ ते ७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग परभणी व जालना जिल्ह्यांत ताशी १२ ते १४ किमी, तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ताशी १२ किमी राहील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ किमी राहील. धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २० किमी राहील. कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर बीड जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस आणि नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान धाराशिव जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, लातूर व जालना जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, नांदेड व बीड जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस आणि परभणी जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ७० ते ७८ टक्के, तर लातूर व जालना जिल्ह्यांत ८४ ते ८७ टक्के, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ९३ ते ९८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत ६० ते ६७ टक्के, तर परभणी जिल्ह्यात ७३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ९५ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात आज (ता.२५) ४ ते ५ मिमी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाभर हलक्या पावसाची शक्यता राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अकोला व अमरावती जिल्ह्यांत ताशी १४ किमी, तर वाशीम जिल्ह्यात ताशी १८ किमी व बुलडाणा जिल्ह्यात ताशी २२ किमी राहील. कमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६८ टक्के राहील.
मध्य विदर्भ
आज (ता.२५) यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३ मिमी पावसाची शक्यता राहील. पुढे आठवडाभर हलक्या पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १४ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ७५ ते ८१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ४८ टक्के, वर्धा जिल्ह्यात ५३ टक्के आणि नागपूर जिल्ह्यात ६३ टक्के राहील.
पूर्व विदर्भ
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत २ ते ५ मिमी पावसाची शक्यता राहील. पुढील आठवडाभर अल्पशा पावसाची शक्यता राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग भंडारा जिल्ह्यात ताशी ९ किमी, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ताशी ११ ते १२ किमी आणि गडचिरोली जिल्ह्यात ताशी १४ किमी राहील. कमाल तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ७३ टक्के, तर गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ८५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ४८ टक्के, गडचिरोली जिल्ह्यात ५६ टक्के, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ६० टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज (ता. २५) कोल्हापूर जिल्ह्यात १६ मिमी, सांगली जिल्ह्यात ८ मिमी, सातारा जिल्ह्यात १२ मिमी, सोलापूर जिल्ह्यात ६ मिमी, पुणे जिल्ह्यात १३ मिमी आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ८ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. कोल्हापूर, पुणे व सातारा जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ किमी राहील; तर अहिल्यानगर जिल्ह्यात ताशी १७ किमी आणि सांगली जिल्ह्यात ताशी २० किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर सातारा जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, सोलापूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सांगली जिल्ह्यात ८४ टक्के, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ८१ ते ९७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ८० ते ९२ टक्के राहील. मात्र सोलापूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के राहील.
कृषी सल्ला
भात रोपवाटिकेची तयारी करून बियाणे गादीवाफ्यावर पेरावे.
फळभाजीपाला लागवडीसाठी रोपवाटिका तयार करावी.
शेतातील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करावा.
खरीप हंगाम नियोजनानुसार बियाणे, खते आणि इतर निविष्ठांची उपलब्धता करावी.
हळद व आले लागवडीची कामे पूर्ण करावीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.