Monsoon Update : बिपरजाॅय चक्रीवादळाचा तडाखा गुजरातमधील किनारी भागाला बसत आहे. जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला असून काही जनावरेही दगावली आहेत.
तब्बल एक लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. माॅन्सूनचा प्रवास मात्र अडखळला आहे. आजही माॅन्सूनने प्रगती केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली.
मॉन्सून ८ जून रोजी केरळमध्ये डेरेदाखल झाला होता. त्यानंतर साधारणतः ७ जूनपर्यंत तळकोकणात येणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने दाखल झाला. माॅन्सूनने सोमवारी कोकण, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये प्रगती केली होती. मात्र त्यानंतर चार दिवस माॅन्सूनची वाट अडखळली. माॅन्सून एकाच ठिकाणावर ठाण मांडून आहे.
यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आजही माॅन्सूनची सिमा रत्नागिरी, कोप्पाल, पुट्टापारथी, श्रीहरीकोटा, मालदा आणि फोरबेसगंज या भागात होती. पण १८ ते २१ जूनच्या दरम्यान माॅन्सून दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग, पूर्व भारत आणि शेजारच्या भागात प्रगती करु शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
बिपरजाॅय चक्रीवादळामुळे किनारी भागाला चांगलाच तडाखा बसत आहे. ईशान्य अरबी समुद्रात घोंगावणारे हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकत आहे. बिपरजाॅय चक्रीवादळाने सौराष्ट्र आणि कच्छ भाग ओलांडला. सध्या हे चक्रीवादळ गुजरातमधील मंडावी आणि पाकिस्तानमधील कराचीच्यामध्ये गुजरातमधील जखाऊ बंदराजवळ आहे.
हे अतितीव्र चक्रीवादळ आता काहीसे कमजोर झाले आहे. सौराष्ट्र आणि कच्छ भागात चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. चक्रीवादळ सातत्याने ईशान्येकडे सरकण्याची शक्यता असून त्याची तीव्रताही कमी होत जाईल. सायंकाळच्या दरम्यान याचे रुपांतर कमी दाब क्षेत्रात होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, मोरबी, राजकोट, जुनागड, वलसाड या गुजरातच्या भागासह लगतच्या दमण दीवलाही या वादळाचा जोरदार फटका बसला. ताशी १२५ किमी वाऱ्याचा वेग असल्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले.
दरम्यान कच्छमधील घरांच्या पडझडीसह दोघांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले. तसेच पिकांसह अनेक जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.