Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. १७) संपूर्ण पूर्वोत्तर भारत, पूर्व भारतातील राज्यातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. देशातील मॉन्सूनची परतीची वाटचाल दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेपेक्षा लांबली असून, संपूर्ण देशातून मॉन्सून परतण्यास आणखी वाट पहावी लागणार आहे.
शुक्रवारी (ता. १३) ईशान्य भारत आणि दक्षिणेकडील काही भाग वगळता उर्वरित देशातून मॉन्सून परतला होता. त्यानंतर मंगळवारी (ता. १७) मॉन्सूनची परतीची वाटचाल सुरूच आहे. संपूर्ण बिहार, पश्चिम बंगाल, पूर्वोत्तर राजे, संपूर्ण तेलंगणासह आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतला आहे. मॉन्सूनची परतीची सीमा मच्छलीपट्टम, कर्नूल, बदामी, ते वेंगुर्ला पर्यंत पोचली आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार १५ ऑक्टोबरपर्यंत मॉन्सून देशाचा निरोप घेतो. यंदा मात्र मॉन्सूनची परतीची वाटचाल लांबली आहे. तळ कोकण, गोवा, कर्नाटक राज्यांसह दक्षिण भारतात अद्यापही मॉन्सूनचे अस्तित्व आहे. संपर्ण देशभरातून मॉन्सून परतण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
दोन्ही समुद्रात कमी दाबाचे संकेत
आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांच्या जवळ समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उद्यापर्यंत (ता.१९) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असून, ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
यातच बंगालच्या उपसागरात अंदमान बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, शुक्रवारपर्यंत (ता. २०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.