Monsoon News : बंगालच्या उपसागरावरून चाल मिळाल्याने गुरूवारी (ता. २२) आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागासह तेलंगणा आणि ओडिशाच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे. पूर्व भारतातील पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागातही मॉन्सून दाखल झाला आहे. तळकोकणात दाखल झाल्यानंतर (ता. ११) महाराष्ट्रात मात्र मॉन्सूनची वाटचाल जैसे थे आहे.
देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये ८ जून रोजी डेरेदाखल झाल्यांनतर रविवारी (ता. ११) मॉन्सूनने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रगती केली आहे. 'बिपॉरजॉय' चक्रीवादळामुळे पश्चिम किनारपट्टीवर चाल केल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली होती.
'बिपॉरजॉय' चक्रीवादळामुळे थांबलेली वाटचाल सुरू झाल्यानंतर मॉन्सूनची प्रगती अडखळतच सुरू आहे. सोमवारी (ता. १९) कर्नाटक, आंध्र प्रदेशचा आणखी काही भागात प्रगती केली. पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार राज्याच्या काही भागात मॉन्सून आगेकूच केली होती.
त्यानंतर गुरूवारी (ता. २२) आंध्र प्रदेशचा उर्वरीत भाग, तेलंगणा, ओडिशाचा आणखी काही भाग, पश्चिम बंगालचा उपसागर, झारखंड, बिहारच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे. मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा दक्षिण भारतात रत्नागिरी, रायचूर, खाम्मम, मलकंगिरी, परलखेमुंडी पर्यंत तर पूर्व भारतात हलदिया, बोकारो, पाटणा, राक्सौलपर्यंत आहे
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, ओडिशाच्या उर्वरित भागासह. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड मध्य प्रदेशच्या काही भागात रविवारपर्यंत (ता. २५) मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.