
IMD Monsoon Update 2023: नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरूवारी (ता. १) अरबी समुद्रात दाखल झाला आहे. दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव आणि कोमोरीन भागात मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
साधारणतः १ जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होत असतो. यंदा आगमन लांबले असून रविवारपर्यंत (ता. ४) मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आगोदरच १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली होती.
मंगळवारी (ता. ३०) संपूर्ण अंदमान, निकोबार बेटसमुह आणि अंदमान समुद्रासह पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला होता.
गुरूवारी (ता. १) मॉन्सूनने अरबी समुद्रात प्रगती केली आहे. दक्षिण अरबी समुद्र, मालदीवसह दक्षिण भारत आणि पश्चिम श्रीलंकेलगत असलेल्या कोमोरीन भागात मॉन्सून दाखल झाला आहे.
तसेच पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात मॉन्सून पुढे सरकला आहे. शनिवारपर्यंत (ता.३) अरबी समुद्राच्या आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.