Monsoon Update : मॉन्सूनचं केरळात आगमन; हवामानशास्त्र विभागानं केलं जाहीर

Monsoon 2024 : नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मॉन्सून गुरुवारी (ता.३०) देशाची मुख्य प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये दाखल झाल्याचं हवामान शास्त्र विभागाने जाहीर केलं.
Monsoon
MonsoonAgrowon

Monsoon News : नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मॉन्सून गुरुवारी (ता.३०) देशाची मुख्य प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये दाखल झाल्याचं हवामान शास्त्र विभागाने जाहीर केलं. मॉन्सून केरळ आणि ईशान्य भारतातील बहुतांश भागात दाखल झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने एक्सवर ट्विट करून दिली आहे. दरवर्षी साधारण १ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होत असतो. परंतु यंदा मात्र मॉन्सूननं दोन दिवस आधीच केरळात हजेरी लावली आहे.

मॉन्सून १९ मे रोजी बंगालच्या निकोबर बेटासह मालदिवच्या काही भागात दाखल झाला होता. त्यानंतर रेमल चक्रीवादामुळं मॉन्सूननं आणखी काही भागात कूच केली. दरम्यान, १ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला होता. प्रत्यक्षात दोन दिवस आधी केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला आहे.

Monsoon
Monsoon : मॉन्सून आज केरळात दाखल होणार

यंदा मॉन्सून हंगामात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशस्त्र विभागाने दिला आहे. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. गेल्यावर्षी मॉन्सून हंगामावर एल निनोचं सावट होतं. त्यामुळे देशातील बहुतांश भागात पावसाचे खंड पडले होते. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.

परंतु आता एल निनो स्थिती निवळत असून जुलै महिन्यात ला निना स्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मॉन्सून हंगामात (जून-सप्टेंबर) चांगला पाऊस पडेल, अशी चिन्हं आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची नजर मॉन्सूनच्या आगमनाकडे लागून राहिलेली आहे.

मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाची सर्वसाधारण तारीख १ जून असते. त्यानंतर सर्वसाधारण ७ जूनला मॉन्सून तळकोकणात दाखल होत असतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com