Maharashtra Rain : कोकण, घाटमाथ्यावर मध्यम पावसाची हजेरी

Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. ठाणे, रायगड, धुळे, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडला. मराठवाडा, विदर्भात पावसाने उघडीप दिली आहे. शेतीतील आंतरपिकांच्या मशागती सुरू आहेत.

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार तर काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी झाल्या. अंबोली मंडलात ७३.८, कणकवली ७२.०, फोंडा ७०.५ मिलिमीटर पाऊस पडला. दरम्यान दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक ७८.४ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मात्र हा पाऊस काही भागात जोरदार तर काही भागात हलका आहे. शुक्रवारी दिवसभर दोडामार्ग तालुक्यात

Monsoon Rain
Maharashtra Rain : कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

मुसळधार पाऊस झाला. मात्र उर्वरित जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होते. दरम्यान सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. रत्नागिरीतील पालगड, आबलोली, लांजा मंडलात ५४.५ मिलिमीटर पाऊस पडला.

खानदेशात धुळे जिल्ह्यातील होळनांथे मंडलात ४२.८ मिमी, सांगवीत २८.३ मिलिमीटर पाऊस पडला. नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत काही अंशी ढगाळ वातावरण आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील वेल्हा मंडलात ६४.३, पानशेत ३३.०, साताऱ्यातील महाबळेश्‍वर ७०.८, कोल्हापुरातील बांबवडे ६०, आंबा ६६.३, तर गगनबावडा येथे ४४ मिलिमीटर पाऊस पडला.

Monsoon Rain
Monsoon Rain : पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील मुंगळा मंडलात सर्वाधिक ६५.८ मिलिमीटर तर मालेगाव मंडलात मध्यम पाऊस पडला. यवतमाळमधील मालखेड मंडलात ७१ मिलिमीटर पाऊस पडला. तर यवतमाळमध्ये ४५.८, लोहारा ४७, वेणी ४१, दिग्रस ४६.५, तर सिंगडला ४२.५ मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांना दिलासा मिळाला.

शनिवारी (ता.६) सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांतील पाऊस (मिमी) : कोकण : कल्याण ४४, नडगांव ४५.३, पडघा ५२. ५, चानेरा ५३.३, खामगाव ४५, दापोली ४९, वाकवली ५०.५, वेळवी ४९, खेड ४९.३, भरणे ५१, पाटपन्हाळे ४६, देवळे ५०.८, भांबेड ४८.५, पुनस ६९.३, विलवडे ५०.३, सावंतवाडी ४६.८, बांदा ६२, सांगवे ५७, नांदगाव ४८.३.

थोडक्यात महत्त्वाचे...

कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

ताम्हिणी घाटमाथ्यावर १७० मिलिमीटर पावसाची नोंद

शिरगाव, दावडी घाटमाथ्यावर १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस

मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

मराठवाडा, विदर्भात, खानदेशात ढगाळ वातावरण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com