Weather Update : किमान तापमानात घट होण्याची शक्यता

Winter Session : राज्यात पावसापाठोपाठ आलेले धुक्याचे सावट दूर होताच किमान तापमानाचा पारा हळूहळू कमी होण्यास सुरवात झाली आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

Pune News : राज्यात पावसापाठोपाठ आलेले धुक्याचे सावट दूर होताच किमान तापमानाचा पारा हळूहळू कमी होण्यास सुरवात झाली आहे. आज (ता. १०) राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. राज्यात गारठा हळूहळू वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात बुहतांश ठिकाणी कमाल तापमान २२ ते ३० अंशांच्या दरम्यान होते. किमान तापमानात चढ-उतार होत असून, जोरदार थंडीची प्रतिक्षा आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

Weather Update
Weather Update : चक्रीवादळ निवळल्यानंतरही राज्यात ढगाळ हवामान; धुक्यात हरवली पहाट

शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.६ (१५.४), जळगाव २८.५(१५.८), कोल्हापूर २९.१ (१९.१), महाबळेश्वर २६.६ (१७.२), नाशिक २९.५ (१६.५), निफाड २९.० (१४.८), सांगली २८.५ (१८.५), सातारा २९.० (१६.७), सोलापूर ३१.०(१८.६), सांताक्रूझ ३२.९ (२१.२), डहाणू ३०.१ (२०.३), रत्नागिरी ३४.०(२१.९),

Weather Update
Maharashtra Weather : आज राज्यात तापमान कसे होते? राज्यातील किमान तापमानात घट

छत्रपती संभाजीनगर २७.६ (१७.१), नांदेड २७.८ (१७.४), परभणी २८.३ (१७.३), अकोला ३०.० (१८.२), अमरावती २७.० (१६.३), बुलडाणा २५.६ (१७.५), ब्रह्मपुरी २७.२ (१६.८), चंद्रपूर २५.२(१५.०), गडचिरोली २७.० (१६.०), गोंदिया २५.४ (१४.४), नागपूर २५.४(१७.२), वर्धा २५.६(१७.२), वाशीम २६.६ (१५.६), यवतमाळ २३.२ (१५.०).

अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान

आग्नेय अरबी समुद्रात मालदीव बेटांजवळ समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्याच्या अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान कायम आहे. काही भागात अद्यापही कमी-अधिक प्रमाणात धुके अनुभवायला मिळत आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com