Maharashtra Weather Forecast: राज्यात थंडीचा कडाका वाढत असून अक्वान चक्रीवादळामुळे तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. आज विदर्भात एक दोन ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे..आज म्हणजेच शुक्रवारी गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांत हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. अक्वान चक्रीवादळाने दिशा बदलल्याने त्याचा महाराष्ट्रावर प्रभाव जाणवणार नाही..Akvan Cyclone Update: दिशा बदलल्याने ‘अक्वान’चा महाराष्ट्रावर प्रभाव नाही.काल बंगालच्या उपसागरातील पश्चिम-मध्य भागावर असलेल्या ‘अक्वान’ तीव्र चक्रीवादळाची आज पहाटे २.३० वाजता तीव्रता कमी होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले.आज सकाळी ७.३० ते ८.३० या कालावधीत या चक्रीवादळाने उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर गोपालपूरजवळून जमिनीवर प्रवेश केला. त्यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर होता, तर वाऱ्यांचे झोत ताशी ९० किलोमीटरपर्यंत पोहोचत होते..आज सकाळी ८.३० वाजता हे चक्रीवादळ दक्षिण किनारपट्टी ओडिशा आणि लगतच्या उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेश परिसरात, गोपालपूरजवळ केंद्रित होते. त्यावेळी ते १९.२ अंश उत्तर अक्षांश आणि ८४.८ अंश पूर्व रेखांशावर होते. हे ठिकाण आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणमपासून १२० किलोमीटर ईशान्येला, ओडिशातील पुरीपासून १३० किलोमीटर पश्चिम-नैऋत्येला आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून २३० किलोमीटर ईशान्येला होते..Maharashtra Weather Update: तापमानातील चढ-उतार कायम राहणार.अक्वान चक्रीवादळ ओडिशातून जवळपास उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढील तीन तासांत त्याची तीव्रता कमी होऊन तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या सहा तासांत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..दरम्यान, राज्यात तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. मागील चोवीस तासात रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.५ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. तर जळगाव येथे निच्चांकी ८ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.