Maharashtra Rain Alert : मध्य महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’

Weather Update : राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी वादळी पावसाची हजेरी कायम आहे. पावसाच्या हजेरीने तापमानात घसरण होत असली तरी उकाडा कायम आहे.
Rain Alert
Rain AlertAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडत आहेत. आज (ता. १९) वादळी पावसाची शक्यता असल्याने राज्यात सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे

राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी वादळी पावसाची हजेरी कायम आहे. पावसाच्या हजेरीने तापमानात घसरण होत असली तरी उकाडा कायम आहे. सकाळी उन्हाचा चटका आणि दुपारनंतर जोरदार वादळी पाऊस असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोकणातील मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सांगली, मराठवाड्यातील परभणी, लातूर, बीड, तसेच विदर्भातील गोंदिया, बुलडाणा, अमरावती, अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली.

Rain Alert
Weekly Weather: मॉन्सून अंदमान व निकोबार बेटांवर दाखल

रविवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१.२ अंश तापमानाची नोंद झाली. नागपूर येथे ४१ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक, ‎ब्रह्मपुरी, ‎चंद्रपूर, ‎अकोला येथे ४० अंशापेक्षा अधिक तर, ‎गोंदिया, जळगाव, अमरावती, बुलडाणा येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमानात मोठी घट झाली आहे.

आज (ता. १९) संपूर्ण विदर्भ, कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला होता.

Rain Alert
Maharashtra Weather Alert: मध्य महाराष्ट्रात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

मॉन्सून जैसे थे

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. १७) संपूर्ण अंदमान -निकोबार बेट समूह व्यापला असून, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. अरबी समुद्रातून चाल करत मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागासह श्रीलंकेच्या दक्षिण भागात दाखल झालेल्या मॉन्सूनची वाटचाल रविवारी (ता. १८) जैसे थे होती.

अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेत

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारपर्यंत (ता. २१) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत (ता. २२)

या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उत्तरेकडे जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

‎रविवारी (ता. १८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३४.५---२४.०

अहिल्यानगर---३६.२---२३.२

‎‎धुळे---३५.०---२२.५

जळगाव---३९.२---२८.४

‎जेऊर---३६.०---२३.०

‎कोल्हापूर---३३.८---२३.९

‎महाबळेश्वर---२५.४---१८.६

‎मालेगाव---३५.०---२४.२

‎नाशिक---३३.४---२३.१

‎निफाड---३५.२---२०.२

‎सांगली---३४.३---२३.५

‎सातारा---३३.७---२४.५

‎सोलापूर---३६.६---२३.४

‎सांताक्रूझ---३३.४---२६.६

डहाणू---३५.९---२६.५

‎रत्नागिरी---३३.५---२६.५

‎छत्रपती संभाजीनगर---३५.८---२५.८

‎धाराशिव---३६.१---निरंक

‎परभणी---३७.८---२४.५

‎परभणी (कृषी)---३७.६---२३.०

‎अकोला---४०.०---२६.८

अमरावती---३९.२---२१.५

बुलडाणा---३९.२---२१.५

‎ब्रह्मपुरी---४०.२---२७.४

‎चंद्रपूर---४०.०---२६.४

‎गडचिरोली---३८.०---२४.६

‎गोंदिया---३९.६---२०.५

‎नागपूर---४१.२---२८.०

‎वर्धा---३७.६---२६.८

‎वाशीम---३७.२---निरंक

‎यवतमाळ---३७.४---२५.०

‎वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com