Weather Update Pune : राज्याच्या उत्तर भागातून मॉन्सून परतण्यासाठी पोषक हवामान झाले आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडिप दिली आहे. आज (ता. ४) राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसाने उघडीप दिलेल्या भागात उन्हाचा चटका वाढला आहे.
झारखंड आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
दक्षिण झारखंडपासून तेलंगणा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे.
राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी येत असून, अनेक भागात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.
राज्यात पावसाची उघडीप कायम राहणार असल्याने मुख्यतः कोरड्या हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.