Rain Update : कोकणात धुवाधार पाऊस

Monsoon Rain : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत धुवाधार पाऊस कोसळत आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरीतील मंडणगड मंडलात सर्वाधिक २४७.३ मिलिमीटर पाऊस पडला. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, विदर्भातील यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, अकोला जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृष्य पाऊस कोसळला आहे. रत्नागिरी तालुक्यातील खालगाव गोताडवाडीला चक्रीवादळाचा तडाखा बसला असून १६ घरांसह ८ गोठ्यांचे सुमारे २३ लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.

वेगवान वाऱ्यांनी घर, गोठ्यांवरील छपरे, कौले कागदासारखी हवेत उडून गेली. त्यामुळे कुटुंबेच्या कुटुंबे उघड्यावर पडली. तर पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तर सिंधुदूर्गमधील भुईबावडा घाटात दरड कोसळली. तर अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार झाले आहेत.

Rain Update
Rain Update : पावसाची उघडीपीने चिंता; पिकांना सोडले पाणी

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात हलका पाऊस पडला. भात रोपांनाही दिलासा मिळू लागल्याने रोपांची वाढ चांगली आहे. कोल्हापुरातील आंबा मंडलात सर्वाधिक ९५.५ मिलिमीटर पाऊस पडला. कडेगाव मंडलात ६४.० मिलिमीटर, मलकापूर ५४.५, बांबवडे ५०.३, साताऱ्यातील लामज ६९.५, महाबळेश्‍वर ६१.५, पुण्यातील वेल्हे ४९.५, जळगावमधील बहाळ मंडलात ४४.५ मिलिमीटर पाऊस पडला. नगर, सोलापूर, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे या भागात पेरण्या वेगात सुरू आहेत.

मराठवाड्यातील जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. हिंगोली मंडलात सर्वाधिक ७१.८ मिलिमीटर तर सिरसम ७०.३, बासंबा ६०, नांदेडमधील सरसम मंडलात ५३.३, जालन्यातील विरेगाव मंडलात ४४.८ मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला.

तर यवतमाळ, नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम पाऊस पडला. यवतमाळमधील सावळी मंडलात ८९.३ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे कापूस, मूग, धान, उडीद, सोयाबीन या पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळत आहे.

Rain Update
Rain Update: आज आणि उद्या राज्यभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

शनिवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेली मंडले : स्त्रोत - कृषी विभाग

कोकण : ठाणे ७९.५, पनवेल ७८.८, पवयंजे ८५.५, ओवले, कर्नाळा ७८.८, मोराबी ६३.५, कर्जत ९२.३, चौक ९२.३, पाली ६०.३, आटोने ५७.३, जांभूळपाडा ५०.०,

बिरवडी ६१.३, माणगाव ६६.३, इंदापूर ६६.३, गोरेगाव ७२.५, निजामपूर ६६.३, रोहा ६३.०, पोलादपूर ६४.८, वाकण ६१.८, खामगाव ७६.३, तला ७७.३, वहाळ ७९,

शिरगांव ७४.३, दापोली ७८.०, आबलोली ९१.५, देवळे ७६.५, देवरुख ८४.८, तेर्ये ८७.३, आंबोली ८०.०, तळवट ७४, भेडशी ७४.

शंभर मिमीहून अधिक पाऊस :

माखजन २०२.०, मुंब्रा ११६.८, महाड १००.५, करंजवडी १५६.३, नाटे १०३.०, खारवली, तुडली १००.५, कोलाड १२१.५, म्हसला ११९.८, मेंढा १२१.५, चिपळूण १५५.८, खेर्डी ११६.५, मार्गताम्हाणे ११४, रामपूर ११४, सावर्डे १२४.५, कळकवणे १२१.३, वाकवली १३४.८, पालगड १८९.८, शिर्शी १११.३, आंबवली ११३.०, भरणे १०९.५, दाभीळ ११७.८, कडवी १७४.३, आंगवली १०९.८,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com