Rain Alert
Rain AlertAgrowon

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

Rain Forecast Maharashtra : मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, ग्वालियर, बांदा, सिधी, जमशेदपूर, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.
Published on

Pune News : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आज (ता. १४) कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच धुळे आणि नाशिक जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची शक्यता आहे.

उत्तर बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, आज (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत असल्याने या भागातही आज (१४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, ग्वालियर, बांदा, सिधी, जमशेदपूर, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

Rain Alert
Monsoon Rain: पावसाची अनेक ठिकाणी उघडीप

राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक हवामान होत आहे. रविवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानाचा पारा तिशीपार पोहोचला आहे. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३४.५ अंश तापमान नोंदले गेले.

Rain Alert
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात पावसाची उघडीप

आज (ता. १४) पालघर, ठाणे, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, नाशिक घाटमाथा, पुणे, घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. धुळे आणि नाशिक जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रविवारी (ता. १३) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३१.८---२५.८

अहिल्यानगर---२९.०---२१.३

‎‎धुळे---३४.०---२१.५

जळगाव---३३.५---२४.६

जेऊर---३२.५---१९.०

‎‎कोल्हापूर---२९.१---२२.६

‎महाबळेश्वर---२०.१---१७.६

मालेगाव---३१.६---२१.४

‎‎नाशिक---२८.४---२१.८

‎निफाड---३०.२---२२.०

‎सांगली---३०.७---२२.४

‎सातारा---२८.६---२२.५

‎सोलापूर---३३.७---२३.४

‎सांताक्रूझ---३१.८---२५.८

डहाणू---३२.४---२६.०

‎रत्नागिरी---३०.९---२४.२

‎छत्रपती संभाजीनगर---३१.५---२२.४

‎धाराशिव---३१.१---२१.४

‎परभणी---३३.०---२३.५

परभणी (कृषी)---३३.०---२२.७

‎‎अकोला---३२.६---२५.३

अमरावती---३१.०---२२.७

‎भंडारा---३४.०---२५.०‎‎

बुलडाणा---३०.०---२२.८

‎ब्रह्मपुरी---३४.५---२६.१

‎चंद्रपूर---३४.२---२४.८

‎गडचिरोली---३२.२---२४.४

‎गोंदिया---३२.७---२४.२

‎नागपूर---३४.०---२५.६

‎वर्धा---३३.५---२५.५

‎वाशीम---३०.६---२३.२

‎यवतमाळ---३२.६---२३.६

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, नाशिक घाटमाथा, पुणे, घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धुळे, नाशिक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com