Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेचा कहर, राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज

Vidarbha Heat Wave : विदर्भात आलेली उष्णतेची लाट कायम असतानाच, राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Weather Update
Weather Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : विदर्भात आलेली उष्णतेची लाट कायम असतानाच, राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १८) दक्षिण कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. उद्या (ता. १९) राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ओडिशातील बौध येथे देशातील उच्चांकी ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात चंद्रपूर पाठोपाठ ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, वर्धा, सोलापूर आणि अमरावती येथे तापमान ४० अंशापार होते. कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपार गेल्याने तसेच तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंश व त्यापेक्षा अधिक वाढ झाल्याने अमरावती, ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे उष्णतेची लाट होती.

Weather Update
Weather update: राज्यात पुढील तीन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

दरम्यान धुळे, जेऊर, मालेगाव, परभणी, भंडारा, गडचिरोली, वाशीम आणि यवतमाळ येथे कमाल तापमान ३९ अंशांपार होते. राज्यात उन्हाच्या चटका आणि उकाडा चांगलाच तापदायक ठरत आहे. अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत असून, उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

Weather Update
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा, विदर्भात उष्णतेची लाट कायम

आज (ता. १८) कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. उद्या (ता. १९) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३८.२---१८.४

अहिल्यानगर---निरंक---१८.५

धुळे---३९.०---१४.५

जळगाव---निरंक---२०.०

जेऊर---३९.५---२०.०

कोल्हापूर---३७.१---२३.०

महाबळेश्वर---३२.८---२०.४

मालेगाव---३९.२---२०.६

नाशिक---३६.१---१९.९

निफाड---३६.५---१४.१

सांगली---३८.३---२१.६

सातारा---३८.२---२०.६

सोलापूर---४०.३---२२.७

सांताक्रूझ---३४.२---२३.२

डहाणू---३३.२---२१.६

रत्नागिरी---३६.३---२३.५

छत्रपती संभाजीनगर---३७.५---२२.८

धाराशिव---३८.६---२१.४

परभणी---३९.४---२३.२

परभणी (कृषी)---३८.५---१८.४

अकोला---४०.५---२३.१

अमरावती---४०.०---२१.५

भंडारा---३९.०---२२.०

बुलडाणा---३७.०---२३.५

ब्रह्मपुरी---४०.९---२२.०

चंद्रपूर---४१.६---निरंक

गडचिरोली---३९.४---२०.४

गोंदिया---३७.८---२०.६

नागपूर---४०.४---२०.८

वर्धा---४०.२---२०.८

वाशीम---३९.६---निरंक

यवतमाळ---३९.६---२१.४

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२०.४---४१.६

मराठवाडा---१८.४---३९.४

पश्‍चिम महाराष्ट्र---१८.४---४०.३

उत्तर महाराष्ट्र---१४.५---३९.२

कोकण---२१.६---३६.६

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

४० अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

चंद्रपूर ४१.६, ब्रह्मपुरी ४०.९, अकोला ४०.५, नागपूर ४०.४, वर्धा ४०.२, सोलापूर ४०.३, अमरावती ४०.

उष्णतेची लाट असलेले ठिकाणे :

अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com