Heat Wave : विदर्भात उष्ण लाट तापदायक

Summer Heat : विदर्भात उन्हाचा चटका कायम असल्याने उष्ण लाट अधिक तापदायक ठरत आहे.
Heat wave
Heat WaveAgrowon

Pune News : विदर्भात उन्हाचा चटका कायम असल्याने उष्ण लाट अधिक तापदायक ठरत आहे. ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४६.७ अंश तापमानाची नोंद झाली आहे, तर अनेक ठिकाणी कमाल तापमान पंचेचाळीस अंशापार गेले आहे. आज (ता. ३१) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला असून, मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

तापमानाचा पारा पन्नाशीपार गेल्यानंतर देशात उन्हाचा चटका हळूहळू कमी होऊ लागला आहे. गुरुवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हरियानातील रोहतक येथे देशातील उच्चांकी ४८.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात उन्हाचा चटका अधिक तापदायक ठरत असून, उर्वरित राज्यात झळा कायम आहेत. ब्रह्मपुरी पाठेपाठ नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर येथे ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेल्याने उष्ण लाट होती.

Heat wave
Heat Wave : चंद्रपुरात उष्ण लाटेचा इशारा

आज (ता. ३१) विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे उष्णतेची लाट येण्याचा इशारा आहे. तर मुंबईसह पालघर, ठाणे, रायगडमध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Heat wave
Weather News : गरमीचा मारा अन् पावसाचा शिडकावा

गुरुवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.७, धुळे ४२.०, जळगाव ४२.०, कोल्हापूर ३४.०, महाबळेश्वर २७.३, मालेगाव ४१.८, नाशिक ३५.३, निफाड ३६.२, सांगली ३५.७, सातारा ३४.३, सोलापूर ३९.८, सांताक्रूझ ३५.०, डहाणू ३६.०, रत्नागिरी ३३.६,

छत्रपती संभाजीनगर ४०.०, बीड ४१.७, नांदेड ४२.८, परभणी ४२.०, अकोला ४२.६, अमरावती ४३.८, भंडारा ४५.०, बुलडाणा ३८.२, ब्रह्मपुरी ४६.७, चंद्रपूर ४४.०, गडचिरोली ४४.०, गोंदिया ४४.०, नागपूर ४५.२, वर्धा ४५.०, वाशीम ४२.६, यवतमाळ ४४.०.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

नागपूर, वर्धा, चंद्रपूर.

४४ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ४६.७, नागपूर ४५.२, वर्धा ४५, भंडारा ४५, चंद्रपूर ४४, गडचिरोली ४४, गोंदिया ४४, यवतमाळ ४४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com