Maharashtra Rain : विदर्भात गारपीटीचा इशारा; राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज 

Weather Update : राज्याच्या इतरही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Pune News : राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटका चांगला वाढला. तर काही ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. तसेच आज विदर्भातील काही भागात गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. राज्याच्या इतरही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

Rain Update
Hailstorm Forecast : विदर्भात गारपिटीचा इशारा

दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान असून, आज विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा आहे.

तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानेदशातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

Rain Update
Weekly Weather : राज्यात अल्प पावसाची शक्यता

तर राज्यात उन्हाचाही कायम राहण्याचा अंदाज आहे. कोकणत आज ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. 

उद्याही विदर्भ, मराठवाडा आणि खानेदशातील काही भागात विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. तर कोकणत ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com