Pune News : राज्याला मॉन्सूनच्या आगमनाचे वेध लागले आहेत. केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनची वाटचाल शनिवारी (ता. १) ‘जैसे थे’ होती. आज (ता. २) मॉन्सूनचे प्रवाह वेग धरण्याची शक्यता असून, ४ जून पर्यंत तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.
दरम्यान, उन्हाचा चटका वाढल्याने राज्यात काहिली वाढली आहे. विदर्भात उन्हाची लाट कायम असल्याने गडचिरोली येथे उच्चांकी ४६ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. २) विदर्भात उष्ण लाटेचा, तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
तापमानाचा पारा पन्नाशीपार गेल्यानंतर देशात उन्हाचा चटका हळूहळू कमी होऊ लागला आहे. शनिवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांत उत्तर प्रदेशातील कानपूर येथे देशातील उच्चांकी ४८.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात उन्हाचा चटका अधिक तापदायक ठरत असून, राज्याच्या उर्वरित भागातही झळा आणि उकाडा कायम आहे. भंडारासह चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेल्याने उष्ण लाट कायम होती.
आज (ता. २) विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे उष्ण लाटेचा, मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. आजपासून (ता. २) विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शनिवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३७.१, धुळे ४२.०, जळगाव ४१.७, कोल्हापूर ३५.८, महाबळेश्वर २८.८, मालेगाव ४२.६, नाशिक ३६.५, निफाड ३७.५, सांगली ३७.३, सातारा ३६.३, सोलापूर ४०.४, सांताक्रूझ ३५.६, डहाणू ३७.०, रत्नागिरी ३४.८, छत्रपती संभाजीनगर ४०.८, बीड ४१.८, नांदेड ४२.४, परभणी ४३.०, अकोला ४३.४, अमरावती ४४.४, भंडारा ४६.०, बुलडाणा ३९.०, ब्रह्मपुरी ४५.०, चंद्रपूर ४५.२, गडचिरोली ४५.०, गोंदिया ४५.०, नागपूर ४५.०, वर्धा ४५.०, वाशीम ४३.२, यवतमाळ ४४.२.
उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी.
उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
नागपूर, वर्धा, चंद्रपूर.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
४४ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :
भंडारा ४६.०, चंद्रपूर ४५.२, ब्रह्मपुरी ४५, गडचिरोली ४५, गोंदिया ४५, नागपूर ४५, वर्धा ४५, अमरावती ४४.४, यवतमाळ ४४.२.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.