

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने ‘मिगजौम’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळ किनारपट्टीकडे येत आहे. मंगळवारी (ता. ५) दुपारपर्यंत हे चक्रीवादळ नेलोर आणि मच्छलीपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) तीव्र झाल्यानंतर रविवारी (ता. ३) पहाटे पासून ‘मिगजौम’ चक्रीवादळ घोंघावू लागले आहे. या चक्रीवादळाचे केंद्र पुद्दुचेरीपासून २९० किलोमीटर, चेन्नईपासून २९० किलोमीटर आग्नेयेकडे, नेल्लूरपासून ४२० किलोमीटर, तर मच्छलीपट्टणम पासून ५३० किलोमीटर आग्नेय दिशेला होते.
पश्चिम आणि वायव्य दिशेकडे सरकून पूर्व किनाऱ्याकडे येणारी ही प्रणाली आज (ता. ४) दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्याजवळ येणार आहे. त्यानंतर उत्तरेकडे वळून ही प्रणाली उद्या (ता. ५) दुपारपर्यंत आंध्रप्रदेशातील नेल्लोर आणि मच्छलीपट्टनमजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या वादळामुळे जनजीवन विस्कळित होणार असून, कच्ची, पक्की घरे, रस्ते, भात पिके, फळ पिके यांचे नुकसान होणार आहे. तसेच जोरदार वारे आणि पावसामुळे झाडे पडणार असून, समुद्र खवळल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पूर्व विदर्भात पावसाची शक्यता
किनाऱ्यालगत येताच या चक्रीवादळामुळे ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहणार आहेत. यामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यासह रायलसीमा, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्यासह समुद्र खवळल्याने एक ते दीड मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील पूर्व विदर्भाच्या काही भागांत ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.