Winter Weather
Winter WeatherAgrowon

Cold Wave In Maharashtra: राज्यात थंडीचा कडाका; अनेक भागांत तापमानात आणखी घसरणीची शक्यता!

Maharashtra Winter Weather : उत्तर भारतातील अनेक भागात पुन्हा थंडीचा कडाका वाढलेला दिसत आहे. तसेच उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातही थंडी वाढली आहे.
Published on

Pune News : उत्तर भारतातील अनेक भागात पुन्हा थंडीचा कडाका वाढलेला दिसत आहे. तसेच उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातही थंडी वाढली आहे. राज्यातील काही भागात आजही किमान तापमान १० अंशापेक्षा कमी झाले होते. तर तापमानातील घट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील अनेक भागात आज थंडीचा कडाका वाढला आहे. बहुतांशी ठिकाणी तापमानात २ ते ३ अंशाची घट झाली आहे. आज राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद धुळे येथील कृषी महाविद्यालयात झाली होती.

Winter Weather
Maharashtra Winter Season: राज्यात थंडीचा कडाका वाढला

धुळे कृषी महाविद्यालयात आज ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.८ अंशाची नोंद झाली. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातही ७ अंश तापमान होते.

Winter Weather
Maharashtra Hawaman Update : तापमानात चढ उतार सुरुच; उत्तर भारतातून थंडी वाऱ्यांच्या प्रवाहामुळे थंडी वाढणार

पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. आज पंजाबमधील आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी थंडी वाढली होत. राज्यातील काही ठिकाणी तापमान १० अंशाच्याही खाली आले होते. तर पुढील २ दिवसांमध्ये राज्यातील किमान तापमानात आणखी घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com