
Maharashtra Winter Forecast : महाराष्ट्रावर आज (ता. १२) १०१४, उद्या (ता. १३) १०१२, मंगळवारी (ता.१४) उत्तर भागावर १०१४ व दक्षिण भागावर १०१२ इतका हवेचा दाब राहील. बुधवारी (ता.१५) १०१४, गुरुवारी (ता.१६) उत्तरेकडील भागावर १०१४ व दक्षिणेकडील भागावर १०१२, तसेच शुक्रवार व शनिवारी (ता. १७, १८) १०१४ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब राहतील.
हवेचे दाब वाढतात, तेव्हा कमाल व किमान तापमानात घसरण होऊन थंडीच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे या आठवड्यात थंडीत चढ-उतार जाणवतील. पहाटे व दुपारी थंडवारे जाणवतील. थंडीचे प्रमाण अधिक राहील. वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन हिमालय पर्वत भागाकडून अतिथंड वारे दक्षिण दिशेने वाहतील. त्यात प्रामुख्याने धुळे, जळगाव, नंदुरबार, पश्चिम विदर्भ या भागात थंडीचे प्राबल्य वाढेल.
आज (ता.१२) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात ढग जमा होऊन कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागांत अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होईल. सध्या सूर्याचे दक्षिणायन सुरू असून, मंगळवार (ता. १४) नंतर उत्तरायण सुरू झाल्यानंतर किमान तापमान हळूवारपणे वाढण्यास सुरुवात होईल. त्यानंतर उन्हाळी हंगामातील भुईमूग, मूग या पिकांच्या पेरणीस हवामान अनुकूल बनेल.
प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १९ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २३ अंश सेल्सिअस राहील. तर हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे राज्यात हवामान ढगाळ निर्माण होण्याची शक्यता राहील.
कोकण :
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत या आठवड्यात हवामान बदल जाणवतील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. तर रायगड जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, ठाणे जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस व पालघर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. मात्र किमान तापमान रायगड जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होईल. सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड जिल्ह्यात ७० टक्के, तर ठाणे जिल्ह्यात ७२ टक्के, तर पालघर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५० ते ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ते ४० टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व पूर्वेकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र :
कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत १० अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस व नाशिक जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५० ते ५२ टक्के राहील. तसेच सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत पूर्व व आग्नेयेकडून राहील.
मराठवाडा :
कमाल तापमान नांदेड व परभणी जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव, परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस, तर नांदेड व जालना जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. तसेच लातूर व बीड जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत ५४ टक्के, तर धाराशिव, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ५० ते ५१ टक्के आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांत ३० ते ३४ टक्के, तर नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३५ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ९ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील.
पश्चिम विदर्भ :
कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती या जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ५१ टक्के, तर वाशीम जिल्ह्यात ५२ टक्के आणि अमरावती जिल्ह्यात ५४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३४ ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील.
मध्य विदर्भ :
कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअस, तर नागपूर जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ४२ टक्के, तर नागपूर जिल्ह्यात ४६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत ३७ टक्के, तर नागपूर जिल्ह्यात ३९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात ताशी ६ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील.
पूर्व विदर्भ :
कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअस राहील. तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ५० ते ५२ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ५५ ते ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३५ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३८ ते ३९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ५ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र :
कमाल तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर सातारा व पुणे जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत १२ ते १३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ७८ टक्के, तर सांगली जिल्ह्यात ५७ टक्के, सातारा, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत ५० ते ५३ टक्के आणि पुणे जिल्ह्यात ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४० ते ४५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
कृषी सल्ला :
- उन्हाळी भुईमुगाची पेरणी या आठवड्यात करावी.
- भेंडी, गवार, दोडका, दुधी भोपळा, कलिंगड या पिकांची लागवड करावी.
- थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फळबागांमध्ये पहाटेच्या वेळी शेकोट्या पेटवाव्यात.
- कुक्कुटपालन शेडमध्ये लाइटचे बल्ब लावावेत. शेडमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी उपाय करावेत.
- पिकांना शक्यतो संध्याकाळी सिंचन करावे. त्यामुळे जमिनीचे तापमान राखले जाते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.