Maharashtra Rain Update: विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता!

राज्यातील विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी हजेरी लावली.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain UpdateAgrowon
Published on: 
Updated on: 

राज्यात पावसानं उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी हजेरी लावली. हवामान शास्त्र विभागाने विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.

आज खानदेशातील नाशिक, जळगाव, मराठवड्यातील जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली नांदेड जिल्ह्यासह विदर्भातील अमरावती, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना ढगांच्या गडगडासह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरीचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update : विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी असून हळूहळू दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच १८ ऑगस्टपासून त्याच्या सर्वसामान्य स्थितीत येण्याची शक्यता आहे.हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज आज जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील विविध भागात पावसाला पोषक हवामान असून हलक्या ते मध्यम सरी पुढील पाच दिवसात हजेरी लावण्याची शक्यताही हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. तसेच काही भागात पावसाची उघडीप असल्यानं शेती कामालाही वेग आळा आहे. ऑगस्टचा दूसरा आठवडा उजडला तरीही राज्यातील बहुतांश जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.