Maharashtra Rain Update : आणखी ४ दिवस पावसाचा जोर; विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात पावसाची शक्यता

Rain Update : राज्याच्या काही भागात जोरदार ते मध्यम सरी पडल्या. तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण होते.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या काही भागात जोरदार ते मध्यम सरी पडल्या. तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने पुढील ३ दिवस राज्याच्या विविध भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.

Rain
Rain In Maharashtra : पाऊस झाडांना घाबरत असेल का ?

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि नगर तसेच जळगाव जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आला.

Rain
Monsoon Rain : पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल

उद्या विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक जिल्ह्यातही येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

सोमवारीही विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर मंगळवारी मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com