Rain In Maharashtra : पाऊस झाडांना घाबरत असेल का ?

Rural Story : पहाटे साडेपाच वाजता कवेलीबाहेर आलो तर काही सेकंद पावसाची बुरबूर येऊन गेली. आभाळ भरलेलं. गारठा जाणवला. आत येऊन पुन्हा पडलो. सव्वा सहा वाजता बाहेर पडलो.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

महारुद्र मंगनाळे

पहाटे साडेपाच वाजता कवेलीबाहेर आलो तर काही सेकंद पावसाची बुरबूर येऊन गेली. आभाळ भरलेलं. गारठा जाणवला. आत येऊन पुन्हा पडलो. सव्वा सहा वाजता बाहेर पडलो. पावलं आपोआप विहीरीकडं घेऊन जातात. दररोज पाणी उपसणं सुरू असल्याने, पाणी जमीन लेव्हलपेक्षा कमी आहे. दररोजच्याप्रमाणं कासवानं दर्शन दिलं. मळ्यात कडू लिंब व सीताफळांच्या झाडांमुळे जंगलाचा फील येत आहे. आमचं शेत म्हणजे झाडी अशी ओळख झाली आहे. असा माहोल बाहेर कशाला शोधू?

फोटो काढतच शेततळ्यावर आलो. आल्याबरोबर सुर्याला हात जोडून म्हटलं, आज दर्शन दिलं नाहीस तर तुझ्या नावानं उपवास करतो बघ.. तसंही तुला मी कालच सांगून ठेवलयं. माझं हे बोलणं ऐकून मला वाटलं की तो ढगाआडून हसतोय... वा रे नास्तिक रुद्रा.. असं म्हणत.

Rain
Monsoon Rain 2024 : वरुणाचा कृपावर्षाव

मी स्वत:शीच हसत फिरणं सुरू केलं. आभाळ एवढं गच्च भरलेलं होतं की, सुर्यदर्शनाची अपेक्षा पूर्ण होणार नाही, असंच मी ही गृहीत धरलं होतं. चार मित्रांना फोनवर बोललो. युट्युब वर गाणी ऐकत दिड तासापेक्षा अधिक वेळ नागव्या पायांनी फिरतच होतो. मधेच राघवेंद्रला फोन केला. आवाजावरून वाटलं की, तब्येत नरमगरमच असावी. मी म्हटलं, आजचा दिवस आराम करा. तसंही मुक्तरंगला तातडीचं काही काम नाही. त्यांना हे अपेक्षित नसावं. कारण कालच मी त्यांना दुपारी तीनपर्यंत काम करू असं म्हटलं होतं.

शेततळ्याहून निघालो तेव्हा सुर्य पुसटसं तोंड दाखवून गेला तेव्हा मी चकीत झालो. ..वाटलं भास झाला असावा. हटवर काळा चहा पिऊन व्यायाम केला. बाहेर आलो तेव्हा ऊन नव्हतं पण स्वच्छ प्रकाश पडला होता. आंघोळ करून, रात्रीचा फोडणीचा भात, रात्रीचंच वरण आणि पेरू खाऊन नाष्ता केला. हट बाहेर आलो तर आकाशात दोस्त दिसत होता. चक्क ऊन होतं. नेहमीसारखं कडकडीट नाही पण जाणवण्याजोगं. तो दिसत होता...

Rain
Village Story : चकवा

मला हाय केलं त्यानं. मी म्हटलं, अखेर दोस्तीला जागलास तर! ही सगळी गंमत आहे. यात कसली धार्मिकता नाही की, अध्यात्म. सुर्य, चंद्र, झाडं, झुडपं, पक्षी, प्राणी माझे सोबती आहेत. त्यामुळं त्यांच्याशी माझा असा संवाद होतोच... मी शिवाजी आपटे या मित्राला म्हटलंही, सध्या सुर्यापासून पावसापर्यंत सगळेजण माझी फेसबुक पोष्ट बघताहेत. नाही तर मी काल सुर्याला दिलेला इषारा त्यानं इतक्या गांभीर्याने घ्यायचं कारण नाही!

माझा नेहमीचा अनुभव आहे की,गावापेक्षा रुद्रा हटवर अधिक पाऊस पडतो.गावात चार-पाच मि.मी.पावसाची नोंद होते तेव्हा शेतात ७-८मि.मी.पाऊस झालेला असतो. मला वाटतं..हे रुद्रा मुळं घडतयं. शिवाजी म्हणाला, तो म्हणतोयस ते मला पटतयं. रुद्रा हट परिसरातील झाडीचा परिणाम असू शकतो. मी म्हटलं, केवळ झाडीचा परिणाम नाही. अधूनमधून माझ्या स्वप्नाच्या माध्यमातून महादेव रुद्रा हटला येतोय. त्याचा हा परिणाम आहे. पाऊस महादेवाला घाबरत असेलच की! शिवाजी जोरदार हसत बोलला, इथं साक्षात महारुद्रा असताना दुसरा महादेव कशाला येईल? उगं लोकांना नादाला लावू नको. मी म्हटलं, माझ्या नादाला लागणं मोठं कठीण आहे. मी थोडाच बुआ, बाबा आहे झुंड गोळा करायला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com