Weather
WeatherAgrowon

Weather Forcast : सौम्य थंडी, ढगाळ हवामानाची शक्यता

Weather Update : संपूर्ण राज्यात तापमानात घसरण न होण्याचे कारण तपासले असता असे दिसून आले, की वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन काही भागांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहिल्यामुळे ढगाळ हवामान आणि तापमानात घसरण होत नाही.
Published on

Maharashtra Weather : महाराष्ट्रावरील हवेचा दाब उत्तरेकडील भागावर १०१२ व दक्षिणेकडील भागावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी राहील. सोमवार तारीख १८ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १०१४ हेप्टापास्कल व दक्षिण भागावर तितकाच हवेचा दाब राहिल्यामुळे थंडीत वाढ होईल. बुधवार (ता.१९) आणि गुरुवारी (ता.२०) उत्तर भागावर १०१४ व दक्षिण भागावर १०१२ हेप्टापास्कल इतका आणि त्यापुढे तसाच हवेचा दाब आठवडा अखेरपर्यंत राहिल्यामुळे थंडीचे प्रमाण वाढेल. मात्र ते सौम्यच राहील.

कोकणात किमान तापमान २० अंश सेल्सिअस, उत्तर महाराष्ट्रात १५ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात १६ अंश सेल्सिअस, विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस उर्वरित विदर्भात १४ ते १५ अंश सेल्सिअस, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात १८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान राहील.

संपूर्ण राज्यात तापमानात घसरण न होण्याचे कारण तपासले असता असे दिसून आले, की वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन काही भागांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहिल्यामुळे ढगाळ हवामान आणि तापमानात घसरण होत नाही. काही जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे मध्य व पूर्ण विदर्भात किमान तापमानात घसरण होत आहे.

संपूर्ण राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. त्याचा फायदा रब्बी ज्वारी पिकांस होईल. मात्र त्यामुळे भाजीपाला, फळपिके आणि इतर पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढेल. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. सकाळ आणि दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. त्यामुळे बहुतांशी जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील.

प्रशांत महासागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान विषुववृत्तीय भागात ३० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे सध्या ‘एल निनो’चा प्रभाव नाही. तसेच हवामान बदल या आठवड्यात जाणवणार नाहीत. याशिवाय पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव वाढेल. दक्षिण पूर्ण अरबी समुद्रात चक्राकार वारे वहात आहेत. त्यामुळे ढगाळ हवामान राहील.

Weather
Cold Weather Update : राज्यात गुलाबी थंडीची प्रतिक्षा

कोकण

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. तसेच रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. पालघर जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यांत ते २० अंश सेल्सिअस राहील आणि रायगड जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील.

रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ते अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ती ४६ ते ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३ टक्के राहील. रत्नागिरी, पालघर व रायगड जिल्ह्यांत ती ३० ते ३४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी राहील व वाऱ्याची दिशा प्रामुख्याने अग्नेयेकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र

नंदूरबार जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील; तर धुळे जिल्ह्यात ते २८ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील; तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ते १७ अंश सेल्सिअस राहील.

धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. नाशिक जिल्ह्यात ते निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४२ ते ४९ टक्के राहील व उर्वरित जिल्ह्यात ती २६ ते २८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ किमी व दिशा अग्नेयेकडून राहील.

मराठवाडा

बीड जिल्ह्यात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील; तर धाराशिव, नांदेड व हिंगोली या जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील.

मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ५८ टक्के राहील; तर परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४८ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत २७ टक्के राहील; तर छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३६ टक्के राहील. धाराशिव जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १७ किमी राहील; तर लातूर व बीड जिल्ह्यांत १३ ते १४ किमी आणि उर्वरित जिल्ह्यात ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून व अग्नेयेकडून राहील.

Weather
Weather News : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच

पश्चिम विदर्भ

बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील; तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ते २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १४ ते १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ४२ ते ४५ टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता या सर्वच जिल्ह्यांत २५ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० किमी व दिशा अग्नेयेकडून राहील.

मध्य विदर्भ

यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील; तर नागपूर जिल्ह्यात ते १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४९ टक्के सर्वच जिल्ह्यांत राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १० किमी व दिशा अग्नेयेकडून राहील.

पूर्व विदर्भ

भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील; तर चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ते २८ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील; तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ढगांचे प्रमाण अधिक राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५२ ते ५९ टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २२ ते २७ टक्के राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. हवामान दुपारी कोरडे राहील.

दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील; तर कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यात ते २७ अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. तसेच सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील व कोल्हापूर जिल्ह्यात ते १९ अंश सेल्सिअस राहील.

आकाश सर्वच जिल्ह्यांत ढगाळ राहील; मात्र नगर जिल्ह्यात ते निरभ्र राहणे शक्य आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७६ टक्के राहील; तर सातारा व सोलापूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६५ टक्के राहील आणि नगर जिल्ह्यात ५१ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता सातारा जिल्ह्यात ५१ टक्के, कोल्हापूर, सांगली व पुणे जिल्ह्यांत ४१ ते ४७ टक्के व नगर जिल्ह्यात ३५ टक्के राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १७ ते १८ किमी, तर उर्वरित जिल्ह्यात १४ ते १५ किमी व दिशा अग्नेयेकडून राहील.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

कृषी सल्ला

जनावरांना लाळ खुरकूत, घटसर्प, फऱ्या आजार प्रतिबंधक लस पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून टोचून घ्यावी.

कोकणात भुईमूग पिकाची पेरणी पूर्ण करावी.

आंबा पालवीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

करडई पिकावरील मावा किडीचे नियंत्रण करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com