Rain update : महाराष्ट्रावर उत्तरेस १००४, तर दक्षिणेस १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब उद्यापर्यंत (ता. १९) राहील. मंगळवार (ता. २०) पासून उत्तरेस १००२ आणि दक्षिणेस १००४ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब कमी होतील. तोपर्यंत कोकण, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता राहील.
महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झाल्यानंतर वाऱ्याचा वेग वाढेल. आणि चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होईल. मराठवाडा, पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. एकूण हवामान स्थिती अवर्षणासारखी आहे. मराठवाडा व विदर्भात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
कोकण
कमाल तापमान सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील.
ढगांची दाटी नसल्यामुळे पावसाला जोर राहणार नाही. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ११ किमी आणि दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत आज आणि उद्या (ता.१८, १९) ३ ते ४ मिमी पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ३८ ते ३९ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ४० ते ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशत: ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १७ ते २३ किमी इतका वाढेल. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून राहील.
मराठवाडा
कमाल तापमान उस्मानाबाद, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस, तर लातूर व जालना जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान धाराशिव, बीड, व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, लातूर व जालना जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील.
नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड व जालना जिल्ह्यांत ६० ते ६१ टक्के, तर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत ५२ ते ५८ टक्के व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७३ टक्के राहील.
सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २० टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी २० किमी इतका राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. आज (ता. १८) धाराशिव जिल्ह्यात ९ मिमी, तसेच लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यांत ३ ते ४ मिमी पावसाची शक्यता राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस तर वाशीम जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २१ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. आज (ता.१८) बुलडाणा जिल्ह्यात ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
मध्य विदर्भ
कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात ५५ टक्के, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ४४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २१ किमी आणि दिशा वायव्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ५३ टक्के, तर चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ३६ ते ३९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून, तर गडचिरोली जिल्ह्यात आग्नेयेकडून व भंडारा जिल्ह्यात वायव्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज व उद्या (ता. १८, १९) कोल्हापूर जिल्ह्यात ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तर सांगली व सातारा जिल्ह्यांत उद्या (ता.१९) ११ ते १२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात आज (ता.१८) १२ मि.मी. तर नगर जिल्ह्यात उद्या (ता. १९) ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर सांगली व पुणे जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील.
कमाल तापमान नगर जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर सोलापूर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ७२ ते ८५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ४७ टक्के राहील. वाऱ्याच्या ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १० ते २० किमी आणि दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
कृषी सल्ला
- जमिनीत ६५ मि.मी. पर्यंत ओलावा म्हणजेच २ ते ३ फूट खोलीपर्यंत माती ओली होऊन वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी.
- विभागनिहाय सिंचनाचा अंदाज घेऊन पीक पद्धतीची निवड करावी.
- भात, भाजीपाला पिकांच्या रोपवाटिका तयार कराव्यात.
- आंबा झाडाचा विस्तार नियंत्रित करण्याच्या दृष्टीने तसेच नवीन पालवी लवकर मिळविण्यासाठी गरजेनुसार छाटणी करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.