Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचं आगमन; रब्बी पेरणीला वेग

Maharashtra Rain Update : राज्यातील थंडीचा जोर काहीसा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on

IMD Alert : राज्यात पावसाने पूर्णत उघडीप दिल्यानंतर ऑक्टोबरचा हिटने अंगाची लाही केली. मात्र आता राज्यातील थंडीचा जोर काहीसा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तसेच पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामानामुळे पावसाची शक्यता नाही, असं हवामान विभागाने जाहीर केलं आहे. कोरड्या हवामानामुळे राज्यात रब्बीतील पेरणी हंगामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतशिवारात शेतकरी कामात दंग आहेत.

Weather Update
November Rain : रब्बी हंगामासाठी पाऊस आणि थंडी साथ देईल का? | Agrowon

राज्यातील तापमानात मागील चार ते पाच दिवसांपासून घट दिसू लागली आहे. सकाळी थंडी जाणवू लागली आहे. दुपारच्या तापमानातही घट झाली आहे. मागील २४ तासात राज्यातील जळगाव येथे तापमान पारा ११ अंश सेल्सियसपर्यन्त खाली घसरला होता. तर देशात भुज येथे ३८.६ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.

रात्रीचा तापमानाचा पारा घसरला आहे. तसेच वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यामुळे थंडीला सुरुवात झाली आहे. पुढील ४८ तासात राज्यातील तापमानात १ ते २ अंशाने बदल होईल. त्यानंतर मात्र किमान तापमानात अजून घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुढील दोन दिवसानंतर राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com