Paus Andaj: दक्षिण भारतात आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस; उत्तर भरतात थंडीची चाहूल

Winter Season : दक्षिण भारतातील अनेक भागात सध्या चांगला पाऊस होत आहे. तर उत्तर भारतात किमान आणि कमाल तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे.
Winter Season
Winter SeasonAgrowon
Published on
Updated on

Pune News : उत्तर भारतात ईशान्य माॅन्सून यंदा वेळेत सक्रीय झाला. त्यामुळे पाऊसमानही चांगले राहत आहे. दक्षिण भारतात १ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या काळात सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त पाऊस झाला, असे हवामान विभागाने स्पष्ट केले.

दक्षिण भारतातील अनेक भागात सध्या चांगला पाऊस होत आहे. तर उत्तर भारतात किमान आणि कमाल तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे. असे असले तरी उत्तर-पूर्व, मध्य आणि ईशान्य भारतात फार मोठा बदल दिसून आलेला नाही.

Winter Season
Kolhapur weather Forecast : कोल्हापुरात लहरी हवामानाचा शेती पिकासह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

तर कमाल तापमान आजही सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने जास्त आहे. दरम्यान आज पूर्व उत्तर प्रदेशात दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली. तसे पश्चिम बंगालमध्येही काही भागात ही स्थिती होती. दक्षिण भारतात आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती केरळच्या किनारपट्टीला लागून आहे. त्यामुळे केरळ आणि तमिळनाडूच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे.

Winter Season
November Weather : नोव्हेंबरमध्ये थंडी कमी राहणार

उपग्रहाद्वारे टिपलेल्या छायाचित्रांमध्ये केरळष तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात ढगांची गर्दी दिसून येत आहे. थिरूअनंतरपूरम, थूथुकुडी, कोलीपट्टी, सिवाकासी, तेनकासी, पेरियार नॅशनल पार्क, परमाकुडी, कराईकुडी, पुडूकोट्टाई, थिरुवारूर ईत्यादी भागात ढगांची रेलचेल सुरु आहे.

दक्षिण भारतात सध्या पाऊस पडत असला तरी मध्य भारतात मात्र पावसाने उघडीप दिल्याची स्थिती आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये मागील तीन दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. मात्र महाराष्ट्रासह मध्य भारतात थंडीची चाहूल लागल्याची स्थिती आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात मागील काही दिवसांमध्ये सकाळी हवेतील गारवा वाढला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com