Kolhapur weather Forecast : कोल्हापुरात लहरी हवामानाचा शेती पिकासह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

Kolhapur Agriculture Crop : धुके हटल्यानंतर शेतीची कामे उशिराने करावी लागत आहेत. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्ग भात, भुईमूग, सोयाबीन काढणीत मग्न आहे.
Kolhapur weather Forecast
Kolhapur weather ForecastAgrowon
Published on
Updated on

Kolhapur Weather : कोल्हापूर जिल्ह्यात हवामान बदलामुळे शेतीसह नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सकाळी दाट धुके, दुपारी कडक उन्हाचा चरखा तर संध्यकाळी धुवाधार पावसाच्या सरी कोसळत असल्याने कोल्हापूरकरांना एका दिवसात तीन ऋतुंचा अनुभव घेण्याची वेळ आली आहे.

आडसाली लागण केलेल्या उसाची वाढ खुंटली आहे तर भात कापणीत अडथळ्यांचा सामना शेतकऱ्यांना करण्याची वेळ आली आहे. अशातच मागास झालेले भूईमुग तर शेतातच कुजून जाण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात गेले चार-पाच दिवस मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने सकाळच्या वेळेस शेतकऱ्यांना शेतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहेत. धुके हटल्यानंतर शेतीची कामे उशिराने करावी लागत आहेत. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्ग भात, भुईमूग, सोयाबीन काढणीत मग्न आहे.

Kolhapur weather Forecast
Kolhapur Assembly Elections : कोल्हापुरात अपक्ष डोकेदुखी वाढवणार, ३ दिवस सुट्टीमुळे सोमवारी उडणार झुंबड

हातकणंगले, शिरोळ तालुक्यात सकाळी धुके, दुपारी उन तर सध्याकाळी पाऊस होत असल्याने शेतीची कामे खोळंबत आहेत. सकाळीच सत्रातील कामे करत असताना धुके हटण्याची वाट पाहावी लागत आहे. तर दुपारी कडक उन्हामुळे घामाच्या धारा वाहत आहेत तर संध्याकाळी ७ नंतर अचानक पाऊस होत आहे.

भात कापणी, भुईमूग काढणी करण्यात शेतकरी गुंतला आहे. शेतकऱ्यांची शेतीची कामे करण्याची धांदल उडाली असतानाच लहरी वातावरणामुळे शेतीच्या कामांसाठी उशीर होऊ लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com